कोपरगाव शहरात दिवसा ढवळ्या मोठ्या चोऱ्या,दोन गुन्हे दाखल
कोपरगाव शहरात दिवसा ढवळ्या मोठ्या चोऱ्या,दोन गुन्हे दाखल
कोपरगाव शहरातील दोन घरे बुधवारी दि.६ दिवसाढवळ्या चोरट्यांनी फोडलीअसून या दोन्ही घरफोडीच्या घटनेत २ लाख ५६ हजार रूपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी पळविला असल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेबाबत रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कोपरगाव शहर आणि तालुक्यात दुष्काळाच्या झळा या वर्षी मोठ्या प्रमाणावर बसणार आहे.त्यामुळे चोरट्यांनी आपापले प्रताप दाखवण्यास सुरुवात केल्याचे आता उघड होऊ लागले असून अशीच एक घटना कोपरगाव शहरात दिवसा ढवळ्या घडली असून यातील
पहिली घटना साई गंगोत्री अपार्टमेंट,साईसृष्टी मध्ये घडली आहे.’साई गंगोत्री अपार्टमेंट’मध्ये रहिवासी असलेले शिक्षक आशिष श्रीराम पारडे यांचे घरी घडली आहे.पारडे हे कामानिमित्त बाहेर गेले असताना त्यांच्या घरावर पाळत ठेवत त्यांच्या घराचे कुलूप तोडुन अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला.त्यानंतर कपाटाची उचकापाचक करून कपाटातील ७५ हजाराचे सोन्याचे मंगळसुत्र,२५ हजाराचे मिनी मंगळसुत्र,३७ हजार ५०० रूपयांची सोन्याची चैन,२४ हजार रूपये किमतीच्या दोन अंगठ्या, २४ हजाराचे सोन्याचे कानातले व बारा हजाराची मुलाची सोन्याची चैन असा एकूण ०१ लाख ९७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवून नेला आहे.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळास शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने व शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदिप देशमुख यांनी भेट दिली.पारडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा क्रं.३०१/२०२४ भा. द.वि.कलम ४५४,३८० अन्वये दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संजय पवार हे करीत आहेत.
दरम्यान दुसरी घटना शहरातील बैलबाजार रोडवरील कृषी मित्र गृहनिर्माण सोसायटीत घडली.ज्येष्ठ विधीज्ञ रायभान तुकाराम भवर (वय ८२) यांच्या घराच्या दरवाजाची कडी उघडून अज्ञात चोरट्याने प्रवेश केला.घरातील कपाट उघडून त्यातून ५६ हजार रूपये रोख, दोन मोबाईल,असा एकूण ५८ हजार ९०० रूपयांचा ऐवज लांबविला आहे.
दरम्यान या घटनेबाबत ऍड.भवर यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पो.हे.कॉ.ए.एम.दारकुंडे हे करीत आहेत.