अयोध्येत ATS ची मोठी कारवाई
ऐतिहासिक क्षणाचा दिवस जवळ आला असताना अयोध्येतील वातावरण भक्तीमय झालं आहे. या भव्यदिव्य सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून बालरुपातील रामलल्लाची मूर्ती मंदिर परिसरात दाखल झाली आहे. या सोहळ्यासाठी देशविदेशातून दिग्गजांची मांदियाळी जमणार आहे. 22 जानेवारीला होणाऱ्या भव्य सोहळ्यापूर्वी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी ATS ची मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 3 संशयितांना अटक करण्यात आली आहे. सोहळ्याला गालबोट लागू नये म्हणून अयोध्येचं छावणीत रुपांतर झालं आहे. प्रत्येक कोपऱ्यावर निमलष्करी दल आणि पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. अशातच गुरुवारी 19 जानेवारीला दहशतवाद विरोधी पथकानं अयोध्येतून तीन संशयितांना गजाआड केलंय.
अयोध्येत खलिस्तान्यांचा कट?
या संशियतांचा संबंध कॅनडात ठार झालेला सुक्खा दुनके, अर्श डल्ला टोळीशी असल्याचं उत्तर प्रद विशेष पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितलं. त्यांनी माहिती देताना सांगितलं की, राज्याच्या दहशतवादविरोधी पथकानं अयोध्या जिल्ह्यात तपासणीदरम्यान तीन संशयित लोकांना अटक केली आहे. अयोध्येत हल्ला करण्याचा कट खलिस्तानी संघटना रचतायेत का? असा प्रश्न समोर आला आहे