मनमाड येथील रेल्वे ओव्हर बीज पुल पडला!
भारतातील उत्तर आणि दक्षिण विभागाला जोडणाऱ्या मध्य रेल्वेच्या मनमाड जंक्शन स्टेशन जवळ असणाऱ्या नगर मनमाड महामार्गावरील इंग्रज कालीन पूल अवकाळी पावसामुळे अचानक कोसळल्यामुळे मोठी धावपळ झाली.
मनमाड येथील रेल्वे स्टेशन समोर असणारा नगर मनमाड उड्डाणपूल हा इंग्रज कालीन होता. अनेक दिवस त्याला झालेले होते .परंतु महाराष्ट्र शासनाने काही दखल घेतली नाही. रेल्वेने सुद्धा काही दखल घेतली नाही. हा पुल दोन दिवसांपूर्वी झालेल्या अति वादळी वारा आणि गारा पडल्यामुळे, अति पावसाने खचला आणि तो पडला . यावेळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू होती.मात्र हा पूल पडल्यानंतर यावेळेस कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु जर जीवित हानी झाली असती तर याला जबाबदार कोण? शासनाने इंग्रज कालीन पुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अशा जुन्या इंग्रज कालीन पुलांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे .जेथे जेथे महाराष्ट्रात जुने इंग्रज कलीन पूल आहेत. ते महाराष्ट्र शासनाने दुरुस्त करावेत किंवा नवीन बांधावेत अशी मागणी आता वाहनधारकांकडून होत आहे.