भारताची जनगणना पुढच्या वर्षी (२०२५) सुरू करण्याच्या हालचाली सरकारी पातळीवर सुरू आहेत. जनगणना प्रक्रिया २०२६मध्ये पूर्ण झाल्यानंतर लोकसभेच्या मतदारसंघांच्या फेररचनेचे काम सुरू होईल. ही प्रक्रिया २०२८मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जनगणनेबाबत केंद्र सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.
मात्र, जनगणना आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या मृत्युंजय कुमार नारायण यांची प्रतिनियुक्ती केंद्राने ऑगस्ट २०२६पर्यंत वाढवली आहे. यामुळे प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिलेली दशवार्षिक जनगणना करण्यासाठीच्या प्रशासकीय चमूचे नेतृत्व कोणाकडे राहणार, याबाबतची साशंकता दूर झाली आहे.
देशव्यापी जनगणना योग्य वेळी केली जाईल आणि तसा निर्णय झाला की मी ती स्वतः जाहीर करेन, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यंदा ऑगस्टमध्ये संसदेला सांगितले होते.