अहिल्यानगर अनेकांची इ केवायसी रखडल्याने वितरकांना डाटा अपडेट करताना चांगल्याच अडचणी येत असून इ केवायसी न केल्यास गॅस कनेक्शन बंद होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
त्याशिवाय अशा ग्राहकांन सबसिडीही मिळणार नाही. प्राप्त माहितीनुसार, इ केवायसी करण्यासाठी गॅस ग्राहकांना काही दिवसांपूर्वी सूचित करण्यात आले होते. शिर्डी परिसरातील साई गणेश गॅस एजन्सीचे सिलेंडर घर पोहोच करणाऱ्या सर्व व्यक्तींकडे डेटा अपलोड करून दिलेला आहे
आणि इ केवायसी करून घेण्याचे काम सुरु आहे ३० जून ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.यापूर्वी दिलेल्या मुदतीत केवायसी करण्याकडे अनेकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
सर्वच गॅसधारकांना केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी न करणाऱ्या नियमित ग्राहकांना तसेच उज्ज्वला योजनेच्या गॅस कार्डधारकांना ३०० रुपये दिली जाणारी सबसिडी कायमची बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गॅस सेवेचा लाभ घेणाऱ्या सर्व ग्राहकांनी घरी सिलेंडर भरतांना आलेल्या व्यक्तीकडेच केवायसी करून घ्यावी, असे आवाहन स्थानिक साई गणेश गॅस एजन्सीधारकांकडून केले आहे. अंतिम मुदतीपर्यंत गॅसधारकांनी केवायसी करणे आवश्यक आहे. अन्यथा सबसिडीसह इतर बाबी मिळणार नसल्याचे चित्र आहे.