महामहिम राष्ट्रपती यांच्या शनिशिंगणापूर दौऱ्यानिमित्त वाहतुकीत बदल!
अहमदनगर – छत्रपती संभाजीनगर या महामार्गावरील शेंडी बायपास ते नेवासा दरम्यान जड वाहतुक पर्यायी मार्गाने-
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे आदेश जारी
अहमदनगर (प्रतिनिधी)महाहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दि. 30 नोव्हेंबर, 2023 रोजी सकाळी शनिशिंगणापूर येथे दौरा आहे. राष्ट्रपती झापवाडी, घोडेगाव या ठिकाणी बनविण्यात आलेल्या हेलिपैड येथून मोटारीने शनिशिंगणापुर येथे जाणार आहेत. या दरम्यान वाहनांच्या ताफ्यास कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक, राकेश ओला यांनी
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३(१)(ब) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन
अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर या महामार्गावरील शेंडी बायपास ते नेवासा दरम्यानची जड वाहतुक खालील मार्गाने वळविण्याचे आदेश जारी केले आहेत.
अहमदनगरकडून घोडेगाव मार्गे नेवासाकडे जाणाऱ्या जड वाहनांकरीता पर्यायी मार्ग – शेंडी बायपास – विळद बायपास- राहुरी – देवळाली प्रवरा- बेलापुर श्रीरामपुर- टाकळीभान मार्गे नेवासा.
नेवासाकडुन घोडेगाव मार्गे अहमदनगर कडे येणाऱ्या जड वाहनांकरीता पर्यायी मार्ग –
नेवासा – टाकळीभान -श्रीरामपुर- बेलापुर -देवळाली प्रवरा- राहुरी- विळद बायपास मार्गे अहमदनगर
अहमदनगर -छत्रपती संभाजी नगर या महामार्गावरील शेंडी बायपास ते नेवासा दरम्यान जड वाहनांना प्रवेश बंद
करण्यात आला आहे.
वाहतुक वळविणेबाबतचा आदेश दिनांक ३० नोव्हेंबर, २०२३ रोजी सकाळी ८.०० वाजेपासून ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत लागू जारी राहील.
हा आदेश अॅम्ब्युलन्स, अग्नीशामक दल, शासकीय वाहने, स्थानिक प्रशासनाकडुन अत्यावश्यक कारणास्तव प्रवेश देण्यात येणारे वाहनांना लागू राहणार नसल्याचे एका आदेशाद्वारे कळविण्यात आले आहे.