शिर्डी प्रतिनिधी
शिर्डी पत्रकार संघ व शिर्डीतील एकमेव निर्भीड
दैनिक साईदर्शनचे सर्वोसारवा उपसंपादक व जेष्ठ पत्रकार राजकुमार विठ्ठल गडकरी यांचा आज शुक्रवार 22 नोव्हेंबर 2024 रोजी वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त त्यांचे सोशल मीडिया,विविध माध्यमांतून व प्रत्यक्ष भेटून अभिनंदन व सत्कार होत आहेत.
दैनिक साईदर्शन परिवाराच्या वतीने त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आहेत.
श्री राजकुमार विठ्ठल गडकरी हे राहाता तालुक्यातील
सावळीविहीर बुद्रुक येथील रहिवासी असून गेल्या 30 ते 35 वर्षापासून ते पत्रकारीता क्षेत्रात काम करत आहेत. पत्रकारितेचा मोठा अनुभव असलेले दैनिक गावकरी, दैनिक सार्वमत, दैनिक प्रभात, दैनिक एकमत, दैनिक झुंजार नेता, दैनिक देशोन्नती छत्रपती एक्सप्रेस आदी वृत्तपत्रांमधूनही त्यांनी यापूर्वी काम केलेले आहे.
सध्या ते दैनिक छत्रपती एक्सप्रेसचे कार्यकारी संपादक असून दैनिक साईदर्शन, दैनिक सत्तेचासंग्रामचे उपसंपादक आहेत. त्याचप्रमाण शिर्डी पत्रकार संघाचे ते सदस्य असून पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांचे अनेक राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम आहे. त्यांनी आतापर्यंत भारतातील संपूर्ण तीर्थस्थाने तसेच पर्यटन स्थळांनाही अनेकदा भेटी दिल्या आहेत.
राज्यातील जवळजवळ सर्वच गड किल्ल्यांना त्यांनी भेटी दिल्या असून त्यांचा राज्यात व राज्याबाहेरही मोठा मित्रपरिवार सद्गुरु साई बाबांवर मोठी श्रद्धा असून धार्मिक वृत्तीमुळे श्री सप्तशृंगी गड पदयात्रा, पंढरपूर पायी दिंडीयात्राही त्यांनी केलेल्या आहेत. दोनदा चारधाम यात्रा झालेल्या आहेत. मात्र कधीही प्रसिद्धीच्या वलयात ते राहिले नाहीत.व त्यांना ते आवडतही नाही. आपले काम, निष्ठा, आणि प्रामानिकपणा आणि स्वाभिमान या गोष्टींवर त्यांचे विशेष लक्ष असते.
माननीय वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ते आद्य क्रांतिवीर
नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाच्या महाराष्ट्र राज्याच्या राज्य सरचिटणीस पदी ते राज्यभर काम करत असून बहिर्जी नाईक चित्र संस्था व गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक प्रतिष्ठान जेजुरीचे ते विश्वस्त आहेत. पत्रकरिता बरोबरच अश्या अनेक क्षेत्रात काम करत असताना त्यांनी आपला स्वाभिमान ,प्रामाणिकपणा जपला आहे, श्री सद्गुरु साईबाबांवर प्रचंड निष्ठा ठेवून श्रद्धा व सबुरीने त्यांचे कार्य हे सर्वांनाच आदर्श आहे.
मनमिळावू व स्वच्छ, निर्भीड, स्पष्ट वक्तपणा असा त्यांचा स्वभाव असल्यामुळे त्यांची राहाता तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात व महाराष्ट्रातही पत्रकार तसेच इतर सामाजिक कार्यकर्त्यांना मध्ये मोठी आपुलकीची भावना व लोकप्रियता आहे. आर्थिक परिस्थिती मध्यम असली तरी मन खूप श्रीमंत व मोठे आहे. त्यामुळेच सावळीविहीर बुद्रुक येथे ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते व त्यानंतर दोनदा सावळीविहीर बुद्रुक वि का स सोसायटीचे संचालक म्हणून येथे ते निवडून आलेले आहेत.
सुशिक्षित व सुसंस्कृत असा परिवार, त्याचप्रमाणे चांगला मित्र परिवार व नातेवाईक , या सर्वांमध्ये ते स्वतःला कधीही आपण एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून वावरताना कधी दिसत नाहीत. लहान थोर व सर्व गोष्टीत समरस होणारे व सर्वांशी सारखेपणाची भावना ठेवून वागणारे
असे व्यक्तिमत्व असणारे तरुण धडाडीचे पत्रकार व आमचे मित्र राजकुमार गडकरी यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शिर्डी पत्रकार संघ व दै. साई दर्शन च्या वतीने हार्दिक शुभेच्छा व सदिच्छा! तसेच त्यांना या पुढील आयुष्य सुख-समृद्धी, उत्तम आरोग्याचे, जावो अशी सद्गुरु साई चरणी प्रार्थना,
जुग जुग जिओ हजारो साल! साल के दिन हो पचास हजार!!
शब्दांकन
श्री. जितेश लोकचंदांनी,
मुख्य संपादक, दैनिक साईदर्शन शिर्डी