शिर्डी( प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत संस्थान म्हणून शिर्डीच्या साई संस्थांनची ओळख आहे. याठिकानी भाविक श्रद्धेपोटी साईबाबांना सोने,चांदी, हिरे,मोती तसेच रोख स्वरूपात दान देत असतात. वर्षाकाठी याच दानाची रक्कम चारशे कोटी रुपयांपेक्षा जास्त साई संस्थांनच्या तिजोरीत जमा होते.
तर दुसऱ्या क्रमांकावर सर्वात जास्त रक्कम ही दर्शन व आरती पेड पासच्या माध्यमातून संस्थांनला मिळते परंतु हेच दर्शन वआरती पासेस कॉम्पुटरच्या सहाय्याने बोगसरित्या तयार करून भाविकांना अव्वा ते सव्वा भावाने विकून आपला आर्थिक स्वार्थ साधणाऱ्या काही अपप्रवृत्ती साई संस्थांनमध्ये कार्यरत आहेत
हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय कारण यापूर्वी बोगस देणगी पावत्या, बोगस दर्शन व आरती पास तसेच भाविकांशी वयक्तिक स्वार्थी संबंध तयार करून आर्थिक लुट तथा फसवणुकीच्या घटना ताज्या असताना पुन्हा एकदा आयटी विभागातील सागर आव्हाड या कर्मचाऱ्याने कॉम्पुटरच्या सहाय्याने बोगस दर्शन पास बनवून तो भाविकाला एक हजार रुपयाला विकल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.
या घटनेनंतर साई संस्थान प्रशासनाने सदर कर्मचाऱ्याला ऑर्डर काढून निलंबित केले असले तरी फसवणूकी सारखा मोठा गुन्हा असूनही या कर्मचाऱ्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला नसल्याने शिर्डीत उलट सुलट चर्चेला उधान आले असून अशा कर्मचाऱ्यांना नेमकी कोण पाठीशी घालत आणि कोण मदत करत याची चौकशीची मागणी शिर्डीतील युवक करणार असून या प्रकारणामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे
आणि या कर्मचाऱ्याने आत्तापर्यंत असे किती बोगस पास तयार करून विकले व किती पैसे कमावले याची चौकशी करण्याची भाजपचे युवा नेते विकास गोंदकर यांनी केली आहे.या मागणीवरून साई संस्थान प्रशासन नेमकी कोणती भुमिका घेते हे महत्वाचे असणार आहे. तर यापूर्वी संशयित असलेल्या एका कर्मचाऱ्याला चौकशी करून उलट पदोन्नती दिल्याने संस्थान प्रशासनाच्या या जुजबी कारवाईमुळे असे कृत्य करणाऱ्यांना धाक राहिला नाही
हेच या घटनेवरून सिद्ध होतय.जनसंपर्क कार्यालयातून वितरीत होणाऱ्या पेड पासेस ची तपासणी अथवा त्यावर कंट्रोल ठेऊन चुकीच्या व्यक्तीला पास वितरीत होऊ नये याची जबाबदारी ही जनसंपर्क अधिकाऱ्याची असते तसा प्रयत्न जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके करत असले तरी याच कार्यालयातील अनेकजनांचे वयक्तिक संबंध असून यातून आर्थिक लाभ उठवीला जातो तर अनेकजन भाविकांच्या पैशातून देशभरात तर विदेशात विमानवारी, पंचतारांकित हॉटेलवर मित्रांसमवेत तर कधी कुटुंबाबरोबर सहलीला जातात हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सामोरं आलं आहे
त्यामुळे एकीकडे संस्थांनमध्ये काहीजण प्रामाणिक सेवा करत असून काही कर्मचारी हे स्वार्थातून परमार्थ साधत असल्याच चित्र साई संस्थांनमध्ये उघड्या डोळ्यांनी स्थानिक बघत आहे मात्र यावर कुठलाही पायबंद अथवा करावाई होत नसल्याने अनेकांनी नाराजी दर्शविली आहे. प्रशासकीय अधिकारी हे एक किंव्हा दोन वर्षासाठी नियुक्त असतात त्यामुळे ते कडक धोरण राबवून ठोस करावाई किंव्हा निर्णय घेण्यास घाबरतात का?
असा सवाल युवा नेते विकास गोंदकर यांनी उपस्थित केला असून बोगस पास तयार करून तो भाविकाला विकला गेल्याच्या या प्रकारनामध्ये साई संस्थान प्रशासनाने पोलीस करावाई केली नाही तर मोठे जन आंदोलन उभे करून संस्थांनला जाब विचारणार असं गोंदकर यांनी दैनिक साईदर्शनशी बोलताना सांगितलं. साई संस्थान सुरक्षा पोलीस अधिकारी रोहिदास माळी यांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस स्टेशनला फिर्याद का दाखल केली नाही ?
तर नेहमीप्रमाणे हेही प्रकरण दाबले जाईल का?असा सवाल विपुल राणे. साईभक्त मुंबई यांनी केला आहे.