डाळ मात्र भ्रष्टाचाराची निलेश लंके
लोकप्रतिनिधी हा विकास कामे करण्यासाठी असतो. मात्र यांचे अपयश झाकविण्यासाठी यांनी मतदारसंघात डाळ आणि साखर वाटली. मात्र ती वाटलेली डाळ देखील पुरवठा विभागाची भ्रष्टाचाराची असल्याची माहिती कळते.
त्यामुळे लवकरच आपण त्याची चौकशी लावणार असल्याचे महाविकास आघाडीचे उमेद्वार निलेश लंके यांनी म्हटले आहे. तर डाळ अन् साखर वाटणाऱ्या खासदाराची गिनीज बुकात नोंद करावी, अशी मिश्किल टिप्पणी देखील यावेळी लंके यांनी केली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेद्वार मा. आमदार निलेश लंके यांची राहुरी तालुक्यामध्ये स्वाभिमान जनसंवाद यात्रा सुरू आहे. यात्रेच्या सहाव्या दिवशी मोमीन आखाडा, मल्हारवाडी, घोरपडवाडी, चिंचाळे, म्हैसगाव, कानडगाव, निंभेरे, तांभेरे सोनगाव,
सात्रळ आदी परिसरामध्ये निलेश लंके सह राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. दरम्यान ठिकठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.