शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी शहरात झारखंड राज्यातील जमशेदपूर येथील प्रमिला संजय नायडू वय ५२ ही महिला गेल्या काही वर्षापासून झुलेलाल मंदिर येथे पतीसह मुलाबरोबर राहते संदरची महिला सात नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास काही कामानिमित्त लक्ष्मीमाता मंदिराकडे जात असताना
जाहिरात
भरधाव वेगाने समोरून दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात काळ्या रंगाची स्वेटर टोपी परिधान केलेल्या तरुणांनी भरधाव वेगाने आपल्या जवळ येऊन आपल्या गळ्यातील १४ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी ओरबाडून नेल्याची फिर्याद या महिलेने शिर्डी पोलिसात केल्यामुळे शिर्डी पोलिसांनी त्या अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता ३(५) ३०९(४) अन्वये गुन्हा दाखल केला असून आधिक तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे करीत आहे