शिर्डी (प्रतिनिधी) सध्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक राजकीय पक्ष व उमेदवार, कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार नियोजनाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मा. खासदार सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश दादा आदीक, शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते,
राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष कपिलजी पवार आदींनी नुकतीच भेट घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. खासदार सुनील तटकरे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महायुतींच्या उमेदवारांच्या प्रचार व नियोजन संदर्भात आढावा घेतला. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उभे असून प्रचारात आघाडी घेतली आहे .
प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील
प्रचार नियोजनाबाबत विचार विनिमय करण्यात आला. महायुतीतील सर्व पक्षातील उमेदवार, कार्यकर्ते यांनी जिल्ह्यामध्ये महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील, यासाठी जोरदार प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.खा. सुनील तटकरे यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस अविनाश आदीक, शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते ,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कपिलजी पवार यांनीही जिल्ह्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार नियोजनासंदर्भात विविध मुद्दे यावेळी मांडले व चर्चा केली.