साईभक्ताच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या साईबाबांना ४३लाखाचा सोन्याचा मुकुट दान
शिर्डी प्रतिनिधी/ भारतात बालाजी नंतर दुसऱ्या क्रमांकाचे देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व मोठा नावलौकिक असलेल्या व साईभक्त भाविकांची मनोकामना पूर्ण करणाऱ्या श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा असल्याने भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. आज एका साईभक्ताने ४३ लाख रुपये किंमतीचा साईचरणी ६४८ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
या सोनेरी मुकूटाची किंमत ४२ लाख ८० हजार रुपये असून सकाळी शिर्डी माझे पंढरपूर या आरतीला हा सुंदर नक्षिकाम असलेला आकर्षक व मनमोहक दिसणारा सुवर्णजडीत मुकुट साईबाबांच्या मुर्तीवर चढवण्यात आला. मुर्तीवर चढवलेला हा मुकुट अतिशय सुंदर असून दानशुर साईभक्ताने संस्थानला दान स्वरूपात दिला असून आपले नाव जाहीर न करण्याची विनंती करत हे गुप्त दान असल्याचे सांगितले आहे
दिवसेंदिवस दानराशी वाढत असताना सुवर्ण अलंकार दागदागिने हिरे हार मुकुट अशा प्रकारचे सुवर्ण अलंकार असलेले दागदागिने दान स्वरूपात येत असून यात अनेक दानशूर दान करताना दान गुप्त दान स्वरूपात दान देताना नाव गुप्त ठेवण्याची काळजी देखील साईभक्त घेत आहेत साईबाबा संस्थान येणाऱ्या दानातुन मोफत भोजनालय हजारो साईभक्त भाविकांना निवास सुविधा त्या बरोबरच शैक्षणिक सुविधा
तसेच हजारो रुग्णांना साईबाबा संस्थान व साईनाथ रुग्णालयाच्या माध्यमातून सेवा देत असुन वर्षाकाठी काही कोटी भाविक साईबाबा मंदिराला भेट देत असुन त्याच्या सेवेसाठी हजारो हात २४तास अविरत सेवा देण्यासाठी योगदान देत आहे त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष यार्लागड्डा जिल्हा अधिकारी सिध्दाराम सालीमठ मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे