मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने राज्यभर फिरून काम करण्याऐवजी सध्याच्या महसूल मंत्र्यांचे कार्यक्षेत्र कनोली-मनोली- कनकापूर पुरतेच मर्यादित राहिले आहे, अशी टीका मंत्री विखे यांच्यावर करत संगमनेर तालुक्यात वाईट प्रवृत्ती येऊ देऊ नका, असे आवाहन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
थोरात म्हणाले, मंत्रीपदाचा एक मान असतो. आपणही महसूल मंत्री म्हणून सहा वर्ष काम केले. मात्र या कार्यकाळात कधीही कुणाची अडवणूक केली नाही. या उलट सध्याचे महसूल मंत्री सत्तेचा वापर करून सर्वसामान्य माणसाच्या जीवनात मोठ्या अडचणी निर्माण करत आहे.
सध्याचे मंत्री मुरूमाचा ट्रॅक्टर पकडण्यासाठी कोतवालाला फोन करतात, इतकी वाईट अवस्था सध्या निर्माण झाली आहे.संगमनेर तालुक्यातील विकास कामांना त्यांनी घातलेला खोडा येथील जनता विसरणार नाही,
असा आशावाद व्यक्त करत गोरगरिबांच्या अन्नात माती कालविणाऱ्या प्रवृत्ती सर्वांनी एकजुटीने रोखायला हव्या. तालुक्यात बाहेरच्या राज्यातील पदाधिकारी येऊ लागल्याने तालुक्यात त्यांच्या माध्यमातून ढाबा संस्कृती वाढत असून तरुण पिढी बिघडविण्याचे काम सुरू आहे.
हे सर्व रोखतांना त्यांच्यासोबत असलेल्या खबऱ्यांचाही वेळीच बंदोबस्त करण्याचे आवाहन थोरात यांनी केले.