धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिक्षाभूमी नागपूर, बुद्ध लेणी औरंगाबाद, अकोला आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रवास करणाऱ्या अनुयायांकडून टोल घेतला जाऊ नये, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash ambedkar) यांनी सरकारला केले आहे. तसेच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र पाठवून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने टोल न घेण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वी गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी टोलमुक्तीचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तर, पंढरीच्या वारीला येणाऱ्या भाविकांकडूनही टोल न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर घेतला होता. त्यामुळे, आता धम्मचक्र परिवर्तन दिनासाठी नागपूरला येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नये, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे.
जाहिरात