जाती आणि धर्माला सध्याच्या राजकारणात बेसुमार महत्व आलेले आहे. ही अतिशय धोकादायक बाब असुन यामुळे देशाची एकता आणि अखंडता धोक्यात येत आहे. मात्र डॉ.राजेंद्र पिपाडा हे याला अपवाद असून ते राहाता तसेच शिर्डी परिसरात जाती-धर्म विरहित विकासाला प्राधान्य देणारे नेते म्हणून सर्वाना परिचित असल्याची दिलीपराव वाघमारे यांनी ग्वाही दिली.
विधानसभा निवडणुक-2024 च्या प्रचाराने शिर्डी विधानसभा मतदार संघातही वेग घेतला असून डॉ.पिपाडा हे त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह मतदार संघातील प्रत्येक वाडी-वस्तीत जाऊन ते कशाप्रकारे शिर्डी विधानसभा मतदार संघाचा विकास करु इच्छितात, हे मतदार राजाला पटवून देत आहेत.
आपण मागील 60 वर्षांपासून एकाच घरात सत्ता देऊनही मतदार संघात किती विकासाची कामे प्रलंबित आहेत, हे आपण सर्व जाणून आहात. त्यामुळे राजुभाऊ पिपाडा यांनी राहाता नगर पालिकेत ज्या पद्धतीने सुधारणा करुन विकासकामे केली,
ती विचारात घेतली तर त्यांना आमदार म्हणून आपण सर्वांनी निवडून दिल्यास ते शिर्डी मतदार संघाचा नक्की कायापालट करतील असे प्रतिपादन मा.जिल्हा उपाध्यक्ष, आर.पी.आय. श्री.दिलीपराव वाघमारे यांनी केले.
राजुभाऊंच्या पत्नी सौ ममता पिपाडा या जेंव्हा राहाता नगर परिषदेच्या नगराध्यक्षा होत्या, तेंव्हा राजुभाऊंनी दलित वस्तीतील अंतर्गत रस्ते अगदी मजबूत बनवून दिले होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जॉगिंग ट्रॅक आणि स्मशानभूमि परिसरात अहिल्यादेवी होळकर जॉगिंग ट्रॅक बनविण्यामागे तसेच उद्यान आणि सुशोभिकरण निर्माण करण्यामागील त्यांची कल्पकता आणि दूरदृष्टी राहाता वासियांनी अनुभवलेली आहे. विकासकामे करतांना त्यांनी कधीही जात-धर्म याला महत्व न देता सर्व जाती-धर्मातील विशेषता: दलित अल्पसंख्यांकच्या समस्यांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे, अशा ओबीसी, दलित, अल्पसंख्यांक सर्वांना चालणाऱ्या डॉ. राजेंद्र पिपाडा यांना एकवेळ आमदारकीची संधी द्यावी, असे दिलीपराव वाघमारे यांनी आवाहन केले आहे.