शिर्डी मतदार संघात मनोज जरांगे वक्तव्यामुळे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये नेमकी कोणती भूमिका घ्यायची असा होत आहे संभ्रम!
शिर्डी (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्याने सर्वच पक्षांमध्ये मोठी धावपळ सुरू झाली आहे .त्यात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी भाजपला मतदान करू नका ,
असे जाहीर आवाहन करत सुपडा साफ करण्याचीही भाषा वापरली आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांचा विधानसभेत फॅक्टर काय करतो, या चिंतेत सर्वजण आहेत. व तशी चर्चा शिर्डी विधानसभा मतदारसंघातही सध्या ऐकायला मिळत आहे.
राज्यामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात असून सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे. राजकीय क्षेत्रातही मराठा समाज पावरफुल असून या मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यात सर्वात मोठे आंदोलन त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले .
त्यामुळे मनोज जरांगे यांच्या वक्तव्याला मोठे महत्त्व निर्माण झाले असून सर्वच राजकीय पक्षांमध्ये त्यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.
मनोज जंरागे पाटील यांनी मराठा समाजाला थेट आवाहान करत आरक्षण न देणाऱ्या पक्षाला मतदान करू नका असे म्हटले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांना विधानसभेत काय होईल याची चिंता आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघात मराठा समाज मोठा आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनात व सभेलाही येथील मराठा समाजाने मोठा सहभाग घेतला होता. समाजाचा प्रश्न म्हणून सर्वांनी हिरारीने त्यात सहभाग नोंदवला. तसे चित्रही दिसून येत होते.
मात्र आता शिर्डी विधानसभा मतदारसंघात राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे हे उमेदवार राहणार आहेत .तेही मराठा समाजाचे उमेदवार आहेत. मात्र ते भाजपकडून उमेदवारी करणार आहेत. असे असताना म्हणून जरांगे पाटील मात्र भाजपाच्या विशेषता भाजपातील काही नेत्यांच्या विरोधात अनेकदा जाहीर बोलले आहेत.
त्यामुळे शिर्डी विधानसभा मतदारसंघातील मराठा समाजाला विधानसभेत मनोज जरांगे यांची बाजू घ्यायची की शिर्डी मतदार संघाचे नामदार विखे यांचे कार्यकर्ते म्हणून नामदार विखे यांच्या पाठीमागे उभे राहायचे असा संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांनी या आठवड्यात दोनदा मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे . या चर्चेची ही सध्या येथे चर्चा होत आहे.
नामदार विखे यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मराठी समाजाचे आहेत. त्यामुळे मनोज जरांगे शिर्डी मतदार संघात काय भूमिका घेतात. याकडे सर्वांचे लक्ष आहे. अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमधून ऐकू येत आहे.