नेवासा दौऱ्यात खा. लोखंडे यांनी सर्वसामान्य भक्ता प्रमाणे ग्रहण केला प्रसाद
खा.सदाशिव लोखंडे यांनी आज प्रचारादरम्यान नेवासा तालुक्यातील भालगाव, गोधेगाव, टोका,प्रवरा संगम, खेडले काजळी, मंगळापुर परिसरात भेटी दरम्यान बहिरवाडी येथील जागृत देवस्थान श्री कालभैरव देवस्थानला जाऊन मनोभावे श्री कालभैरव नाथांचे दर्शन घेतले..
यावेळी ३० वर्षाच्या राजकीय कालावधीत आपल्या साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अश्या स्वभावासाठी परिचित असलेल्या खा.लोखंडे यांच्या साधेपणाचा उपस्थितीतांना पुन्हा एकदा प्रत्यय आला..
कालभैरव देवस्थानच्या प्रसादालय मध्ये नेहमीप्रमाणे महाप्रसाद सुरु असताना खासदार लोखंडे यांनी सुद्धा सामान्य भाविकांप्रमाणे रांगेत उभे राहून स्वता आपले जेवणाचे ताट घेऊन भाकरी, भात आणि आमटी प्रसादाचा सर्व भाविकांसोबत जमिनीवर बसून महाप्रसादाचा लाभ घेतलाय..
दरम्यान एका ठिकाणी हळद समारंभ सुरू असताना नव वधू वरांना आणि कुटुंबाला भेट देत शुभेच्छा दिल्या..
एकंदरीत मोठा मतदारसंघ आणि शेकडो गावे वाडी वस्त्या आणि नागरिकांच्या गाठीभेटी हे निवडणूकीत क्रमप्राप्त जरी असेल तरीही या प्रचारादरम्यान खा.सदाशिव लोखंडे यांनी रस्त्यात भेटणाऱ्या दुकानदार,नागरिक आणि अगदी एक दोन जणांना सुद्धा आपुलकीने चौकशी करत त्यांच्या समवेत फोटो काढले
याच दरम्यान रस्त्यात काही कार्यकर्ते भेटले असता भर उन्हात खाली उतरून त्यांची भेट घेत त्यांच्या फोटोचा आग्रह पूर्ण केला एकूणच खा. लोखंडे यांच्या साधेपणाची नागरिकांमधून चर्चा होताना दिसून येत आहे..