पोलीस कर्मचाऱ्यांची अन्यत्र बदली होवून देखील अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेत त्यांचा बस्थान कसा ?
शिर्डी प्रतिनिधी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या १७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या, मात्र बदल्या होऊन देखील वर्षभराचा कालावधी उलटूनही या कर्मचाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अद्यापही कार्यमुक्त न केल्याने त्यांच्या चौकशीचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिले आहेत. दैनिक साईदर्शनचे संपादक जितेश लोकचंदानी यांनी माहिती अधिकारात हि माहिती मागवलेली आहे व अहमदनगर मधील सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी या संदर्भात पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या विरोधात विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार केली होती.
शेख यांनी केलेली तक्रार गंभीर स्वरूपाचे असल्याने यासंदर्भात नगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी चौकशी करून कार्यवाहीचा अहवाल सात दिवसात सादर करण्याचे आदेश दिले आहे. बदली होऊन देखील या सतरा कर्मचाऱ्यांना पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेत ठेवण्यामागे काय कारण आहे.बदल्या होऊन देखील हाताखालील कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न करणाऱ्या पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या विरोधात शेख यांनी पोलीस महासंचालक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. शेख यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत पोलीस महानिरीक्षकांनी हे आदेश दिले आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस कर्मचारी दर्जाच्या ९२५ व चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक के चालक पोलीस शिपाई दर्जाच्या ५९ कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे आदेश ३० एप्रिल २०२३ रोजी दिले होते. यात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेतील ३१ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यातील १७ कर्मचाऱ्यांना एक वर्षाचा कालावधी उलटून देखील कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाने या कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देखील दिलेली नाही असे असताना देखील वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करत गुन्हे शाखेचे निरीक्षक आहेर यांनी या कर्मचाऱ्यांना गुन्हे शाखेत कार्यरत ठेवले आहे.
याशिवाय सायबर सेलमधील अनेक कर्मचाऱ्यांना कामाच्या सोयीसाठी स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत ठेवले आहे. सायबर पोलीस ठाणे हा स्वतंत्र विभाग असून तो स्थानिक गुन्हे शाखेच्या अंतर्गत येत नसताना देखील पोलीस अधीक्षकांनी आपल्या पदाचा गैर उपयोग करून त्यांच्याकडील आदेश क्र. कक्ष-१(१) असि-आस्था/बदली नेमणूक/ ४९४६/२०२३ दि.०३/०४/२०२३ च्या आदेशान्वये सायबर पोलीस ठाणे अहमदनगर येथे पोलीस निरीक्षक पदावरुन स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर येथे नवीन नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडे सायबर पोलीस देखील दिलेली नाही असे असताना देखील वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करत गुन्हे शाखेचे निरीक्षक आहेर यांनी या कर्मचाऱ्यांना गुन्हे शाखेत कार्यरत ठेवले आहे.
याशिवाय सायबर सेलमधील अनेक कर्मचाऱ्यांना कामाच्या सोयीसाठी स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत ठेवले आहे. सायबर पोलीस ठाणे हा स्वतंत्र विभाग असून तो स्थानिक गुन्हे शाखेच्या अंतर्गत येत नसताना देखील पोलीस अधीक्षकांनी त्यांच्याकडील आदेश क्र. कक्ष-१(१)असि-आस्था/बदली नेमणूक/ ४९४६/२०२३ दि.०३/०४/२०२३ च्या आदेशान्वये सायबर पोलीस ठाणे अहमदनगर येथे पोलीस निरीक्षक पदावरुन स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर येथे नवीन नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडे सायबर पोलीस ठाण्याचे अतिरिक्त कामकाज सुध्दा देण्यात आलेले आहे. सदरची बाब संयुक्तीक नसून त्याचे कारण सायबर पोलीस ठाणे येथे स्वतत्र पोलीस निरिक्षक पद मंजुर असताना त्या ठिकाणी नवीन पोलीस निरीक्षकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. पोलीस निरीक्षक दर्जाचे अनेक पोलीस निरीक्षक पोलीस नियंत्रण कक्षात उपलब्ध असताना किंवा इतर अतिरिक्त पोलीस निरीक्षक उपलब्ध असूनही नवीन अधिकाऱ्याची नेमणूक न करता आहेर यांच्याकडे या शाखेचा गेल्या वर्षभरापासून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या आस्थापना सूचीवर दोन पोलीस निरीक्षकांची पदे मंजूर असताना देखील केवळ एका पोलीस निरीक्षकाचे पद भरण्यात आले आहे. यासाठी देखील शेख हे ऑगस्ट २०२१ पासून पाठपुरावा करत असून अद्यापही यावर कोणतेही कार्यवाही झालेली नाही.
राज्यात क्षेत्रफळाने मोठा असलेल्या या जिल्ह्यात १४ तालुक्यांचा समावेश आहे. ७ महसूल विभाग असून ज्या बाबींचा विचार करता या शाखेत दोन पोलीस निरीक्षकांची नेमणूक करणे आवश्यक आहे. स्थानिक गुन्हे शाखेत आणखी एका पोलीस निरीक्षकासह सायबर सेलमध्ये देखील स्वतंत्र पोलीस निरीक्षकाची नियुक्ती करण्याची तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी शेख यांनी आपल्या तक्रारीत केली होती. ह्या सर्व प्रकरणी लाखो रुपयांची देवाणघेवाण झाल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे?पोलीस निरीक्षक आहेर हे पोलीस अधीक्षक यांचे अत्यंत निकट व विश्वासातील आहेत आहेर यांच्या सांगण्यावरून कोणाची कुठं बदली करावी कोणाला कुठे ठेवावे हा अनाधिकृतपणे अधिकार आहेर यांच्याकडे आहेत कारण कि माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीत आहेर यांनी बदली झालेल्या कर्मचारी यांचे नावे दिली होती तेच कर्मचारी सध्याही त्याच ठिकाणी सेवेत आहेत त्याचीही माहिती मागितली आहे कि कोणाच्या आदेशाने ह्या बदली झालेल्या कर्मचारी यांना त्याच सेवेत ठेवण्यात आले आहे त्याचीही माहिती आहेर यांनी दिली नसल्याने ह्यामागील गौळबंगाल काय आहे?
दिनेश आहेर यांनी माहिती अधिकारात खोटी व बनावट माहिती दिल्याची तक्रार मा. माहिती आयुक्त यांच्याकडे पाठवली आहे त्यात एक कर्मचारी यांच्यावर लाच घेतांना रंगेहात पकडले आहे त्यांवर गुन्हा सुद्धा दाखल असतांना तो कर्मचारी सुद्धा त्याच ठिकाणी अनेक वर्षांपासून ठाण मांडून आहे त्याची आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधिक दोषींवर कारवाई होण्यासाठी अहिल्यानगरचे सामाजिक कार्यकर्ते शेख आणि दैनिक साईदर्शनचे संपादक जितेश लोकचंदानी हे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे प्रयत्न करणार आहेत