राज्यात गाजलेल्या रेखा जरे हत्या कांडातील मुख्य सरकारी साक्षीदार डॉ. विजय मकासरे यांच्यावर अज्ञात दुचाकी स्वरांनी त्यांच्या चार चाकी वाहनाला गाडी आडवी लावत मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली असून मकासरे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याचे सांगण्यात आले आहे.सदर घटना ही आज शुक्रवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजे दरम्यानं घडल्याचे समजले आहे.
याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी की डॉक्टर विजय मकासरे हे श्रीरामपूर कडून राहुरी कडे येत असताना राहुरी व राहुरी फॅक्टरी दरम्यान बुलेटवर पाठीमागून आलेल्या दोघा जणांनी मकासरे यांच्या चार चाकी वाहनाला गाडी आडवी लावत तू आमच्या बाजूने साक्षी दे अन्यथा तुझा बेत पाहू आम्ही वरती सर्व सेटिंग केलेली आहे त्यामुळे तू जास्त वळवळ करू नको असे म्हणून धमकीदेत त्यांना मारहाण केली असल्याची घटना घडली आह
याबाबत डॉक्टर विजय मकासरे यांच्याशी संपर्क साधला असता माझ्या जीविताला धोका असून मला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नसल्याने मी पोलीस महासंचालक यांच्या दालनासमोर उपोषणाला बसणार आहे.यासह मला सरकारी साक्षीदार करू नये यासाठी मी विनंती करणार असल्याचे डॉक्टर मकासरे यांनी म्हटले आहे.