नवीन दर्शन रांग होऊनही अचानक रविवारी गर्दी वाढल्याने दर्शन रांगेचेही कोलमडले नियोजन!
शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डी येथे नाताळ तसेच सलग तीन दिवस शासकीय सुट्ट्या, दत्तजयंती यामुळे रविवारी साई भक्तांची मोठी गर्दी झाली होती . काही कोटी रुपये खर्च करून नवीन दर्शन रांग रंग संस्थांनने केली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते तिचे उद्घाटन झाले. त्यामुळे साई भक्तांना आता गर्दी काळात तरी व्यवस्थित दर्शन रांगेतून दर्शन मिळेल अशी आशा होती. मात्र आज गर्दीमुळे ही साई भक्तांची अपेक्षा फोल ठरली गेली. साई भक्तांना नवीन दर्शन रांगेच्या बाहेरही उन्हामध्ये गर्दीमुळे काही तास उभे राहावे लागले .त्यामुळे साई भक्तांकडून थोडीशी नाराजी ही व्यक्त होताना दिसत होती.
शिर्डी आज सुट्ट्यांमुळे रविवारी साई भक्तांची मोठी गर्दी झाली. नगर मनमाड महामार्गावर मोठ्या प्रमाणात साई भक्तांची वाहने होती. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी ती रिंग रोडने वळवली. नवीन दर्शन रांग ही सोयी सुविधा युक्त अशी आहे. मात्र आज रविवारी इतकी गर्दी झाली की दर्शन रांग ही भरली होती. मात्र दर्शन रांगेमध्ये तळमजल्यावर काही हाल पेसेज रिकामे ठेवण्यात आले, तेथे भक्तांना बसण्याची ,सावलीची सर्व सुविधा असताना दर्शन रांगेच्या बाहेर भक्तांना काही वेळ उभे करण्यात आले होते. अशी भक्तांकडून चर्चा आहे. साई संस्थानने यापुढे गर्दीच्या काळात नवीन दर्शन रांगेमध्ये जे जे हॉल आहेत. मोकळे पॅसेज आहेत.
ते संपूर्ण भक्तांसाठी खुले करावेत. अशी मागणी साई भक्तांकडून यावेळी होत होती. दर्शन रांगेत मोकळे पॅसेज आहेत. येथेही सर्व सुविधा आहेत.मग तेथेही साई भक्तांना गर्दी काळात तरी निदान बसण्यासाठी तरी व्यवस्था केली जावी . कारण वृद्ध, लहान मुले महिला यांना गर्दीमुळे बाहेर उन्हामुळे थंडीमुळे त्रास होतो.अशी मागणी होत आहे.