साई संस्थानच्या माजी मुख्य कार्यकारी महिला अधिकाऱ्यांच्या नावाने पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार!!
साईबाबा संस्थानच्या माजी महिला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने पैसे उकळले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. माझ्या सीआरपीएफ मधील अधिकारी असलेल्या मित्राची बदली झाली असून त्याला घरातील फर्निचर विकायचं आहे.
माजी महिला आयएएस अधिकारी यांच्या बनावट फेसबुक अकाऊंटवरुन एक मेसेज अनेकांना मिळाला आणि अनेकांनी खात्री न करताच दिलेल्या अकाऊंट नंबरवर पैसे ट्रान्सफर केले.
मात्र ते फेसबुक अकाऊंट बनावट असल्याचं लक्षात आल्यानंतर अनेकांना धक्का बसला. पैसे ट्रान्स्फर करणाऱ्यांमध्ये साईबाबा संस्थानमधील काही कर्मचारी देखील असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत महिला आयएएस अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी सायबर सेलला तक्रार केली आहे.
साईबाबा संस्थानमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलेल्या आयएएस अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या नावाचं बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन फ्रेंड लिस्टमधील लोकांना पैशांची मागणी केली जात आहे.