शिर्डी ( प्रतिनिधी)मराठी सिने अभिनेता व दिग्दर्शक महेश कोठारे यांनी आज सोमवारी शिर्डीला भेट देऊन श्री साई मंदिरात दुपारच्या माध्यान्ह आरतीला उपस्थित राहुन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साईदर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे यांनी त्यांचा शालप्रसाद देऊन सत्कार केला.
यावेळी, मंदीर प्रमुख विष्णु थोरात उपस्थित होते. त्याचप्रमाणे प्रसिद्ध सिने अभिनेत्री कतरीना कैफ यांनीही शिर्डीला भेट दिली व त्यांनी श्री साईबाबांच्या मंदिरात जाऊन श्री साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. साईदर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे यांनी त्यांचा शाल प्रसाद देऊन सत्कार केला. यावेळी,
मंदीर प्रमुख विष्णु थोरात उपस्थित होते. प्रसिद्ध सिने अभिनेत्री कतरीना कैफ तसेच प्रसिद्ध अभिनेता व दिग्दर्शक महेश कोठारे हे शिर्डीत आल्याचे समजताच साईभक्त व उपस्थित ग्रामस्थ त्यांना मंदिर परिसरात पाहण्यासाठी गर्दी केली होती. अनेकांनी त्यांना हात हलवून अभिवादनही केले.