Letest News
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्यात! शिर्डी विमानतळावर करण्यात आला सत... पांढऱ्या कापडात गुंडाळलेल्या ५ वर्षाच्या मुलाचा मृतदेह गोदावरीच्या पात्रात मिळाला शिर्डी येथिल शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई निवृती गायकवाड... saibaba mandir news नाताळ व नवीन वर्षाच्या तयारीसाठी साईबाबा संस्थान कडून तयारी यूपी योद्धा प्रो कबड्डी लीग च्‍या टिमने श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले अपघातात मयत झालेल्या अनोळखी व्यक्तींच्या ओळखीसाठी संपर्क साधण्याचे एमआयडीसी पोलिसांचे आवाहन! शिर्डीत दोन वेगवेगळ्या घटनेत दोन साईभक्त महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने धूम स्टाईल लंपास! धूम स्ट... अहिल्यानगर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी! शिर्डीतील एका क्रीडा शिक्षिकेने पुणे महापालिकेच्या बसमध्ये दारुड्या प्रवाशाला दिला चोप! महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शिर्डीला भेट देऊन घेतले साईबाबांचे ...
क्राईमशिर्डी

अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील त्या नीच पृवृत्तीच्या पोलीस कर्मचारीवर बाबांचा दांडा फिरालाच दीड लाखाची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल

शिर्डी येथे सन अँड सॅन रोड येथे दि.21/03/2024 रोजी सकाळच्या वेळी  हा हॉटेलवर होता त्याने फिर्यादीत सांगितले आहे कि 10/30 वा चे सुमारास आमचे हॉटेलचे पाठीमागील भागात असलेल्या पार्किंगमध्ये शिर्डी गावातील संपत वायकर व साईनाथ पवार यांच्यात हत्यारे घेवुन भांडणे झाले होते त्यात फायरिंग देखील झाली होती. त्यानंतर काही वेळाने पोलीस तेथे आले चौकशी करून निघुन गेले होते. त्यानंतर रात्री 09/30 वाजता फिर्यादी   व भाउ असे हॉटेलवर असतांना हॉटेलवर पोलीस गाडी आली त्यातील साध्या कपड्यात आलेल्या पोलीसांनी फिर्यादीस उचलून नेले व फिर्यादीच्या मोबाईल वर मो.नं. 7972963017 यावरून फोन आला व समोरुन मी संदिप चव्हाण पोलीस बोलत असल्याचे फिर्यादीस  सांगितले सकाळी तुमच्या हॉटेलच्या पाठीमागे भांडणात फायरिंगच्या मॅटरमध्ये तुझे भावाला नगर एलसीबी ऑफिसला घेवुन चाललो आहे. त्यात त्याला आरोपी करायचे नसेल तर 2,00,000/- रुपये घेवुन ये आणि तुझे भावाला घेवुन जा. असे सांगितले त्यानंतर पुन्हा 12.00 वाजता देखील फोन करुन पैसे घेवुन बोलवत होते. दि.22/03/2024 रोजी पुन्हा सकाळी माझे वर नमुद मोबाईल फोन वर संदिप चव्हाण पोलीस योनी फोन करून पुन्हा सांगितले तुझे भावाला फायरिंगच्या गुन्हयात आरोपी करायचे नसेल तर तुला सांगितले तेवढे पैसे घेवुन ये आणि तुझे भावाला घेवुन जा. मला त्यांना लाच देण्याची इच्छा नाही म्हणुन मी अॅन्टी करप्शन ब्यूरो, नाशिक कार्यालयात संपर्क करून माझे तक्रारीबाबत सविस्तर माहिती दिलेली होती, त्याअनुशंगाने श्रीमती गायत्री जाधय पोलीस निरीक्षक अॅन्टी करप्शन ब्यूरो कार्यालय नाशिक यांनी माझेकडून माहिती घेवून मी त्यांना सांगितले की, मी भावाला परत आणण्यासाठी दि. 22/03/2024 रोजी नगर एलसीबी ऑफिसला जाणार आहे त्यावेळी चव्हाण पोलीस हे माझेकडे लाचेची मागणी करतील अशी मला खात्री आहे त्यांनी लाचेची माणगी केल्यास त्यांचेविरुध्द कारवाई होणेकामी विनंती केली व जाधव मॅडम यांना अहमदनगर शहरात आल्यानंतर भेट घेण्यास सांगितले. दि. 22/03/2024 रोजी 11/10 वा चे सुमारास अहमदनगर शहरातील सावेडी नाका, डॉन बॉस्को रोडवर फोनद्वारे झालेल्या संपर्काप्रमाणे श्रीमती गायत्री जाधव पोलीस निरीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो नाशिक यांच्याशी भेट झाल्यानंतर त्यांनी त्यांचा परिचय करून देवुन त्यांच्या सोबत पंच नं. 1) श्री. आकाश तुकाराम रुपवते, वय 31 वर्षे, वनरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी सिन्नर (प्रादेपिक) यांचे कार्यालय सिन्नर ता. सिन्नर जि. नाशिक पंच नं. 2) श्री. गोरख काशिराम पाटील, वय 55 वर्शे, वनरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी सिन्नर (प्रादेपिक) याचे कार्यालय सिन्नर ता. सिन्नर जि.नाशिक व सापळा पथकाचा परिचय करुन दिला त्यानंतर मी दोन्ही पंचासमक्ष माझी तक्रार माझे स्वहस्ताक्षरात लिहून दिली. सदर तक्रारीचे अनुशंगाने पोलीस निरीक्षक श्रीमती गायत्री जाधव मॅडम यांनी दिनांक 22/03/2024 रोजी माझेकडे लोकसेवक संदिप चव्हाण पोलीस हे लाचेची मागणी करतात अगर करो? याची पडताळणी करणेकामी मला पंच क्र. 01 श्री आकाष रुपवते यांच्यासोबत लोकसेवक संदिप चव्हाण पोलीस यांच्या भेटीसाठी एलसीबी ऑफिस येथे पाठविणेबाबत सर्वानुमते ठरविण्यात आले होते. त्यानंतर मला व पंच नं. 1 श्री. आकाष रुपवते अषांना पडताळणी कारपाईकामी आवष्यक सुचना देयुन व्हॉईस रेकॉर्डर चालू करून देवून माझे कडील इरटिगा कार क्रमांक एमएच 17 सीएक्स 5396 ने एलसीबी कार्यालय अहमदनगर येथे रवाना केले. मी व पंच नं. 01 श्री रुपवते माझे कडील इरटिगा कारने अहमदनगर शहरातून चव्हाण पोलीस भेटणार असलेल्या अहमदनगर एलसीबी ऑफिस येथे गेलो. तेथे गेल्यानंतर मी संदिप चव्हाण पोलीस यांना फोन लावला व सांगितले दादा आम्ही आलो आहे. थोड्या वेळातच चव्हाण पोलीस तेथे आले व म्हणाले की, सांगितलेल केला का, तु नसन केल तर जा ते सांगितलेल आणला का तु असे बोलु लागले. मी त्यांना लगेच करतो तुम्ही मला फक्त तेवढ कमी करा एवढं होणार नाही असे बोलुन पैसे कमी करण्याची वेळोवेळी विनंती केली असता, त्यावेळी चव्हाण पोलीस यांनी मागीतलेल्या पैशातुन पाच पन्नास कमी करना, तु डायरेक्ट साठ घ्या म्हणतो.. मी तुझ्यासाठी बोलण खाबु का ?.. ते आरोपी करतील. त्यावेळी मी त्यांना म्हणालो की, कमीत कमी किती त्यावेळी त्यांनी दिड असे सांगितले तेव्हा मी त्यांना दिड लाख म्हणालो असता त्यांनी हो म्हणून सांगितले, त्यावेळी मी त्यांना म्हणालो ‘आमची परिस्थिती नाही मार्च एंड चालु आहे संध्याकाळ पर्यंत वेळ दया. त्यावेळी त्यांनी मला तु कुट काही बोलला का असे विचारले मी त्यांना नाही सांगितले असता, ते म्हणाले की, बघ रे याला काही लावलं विवल काय काही भरवसा नाही याचा त्यावेळी त्यांना माझा संशय आल्याने मी तेथून निघुन सापळा पथक थांबल्या ठिकाणी आलो होतो, त्यानंतर सापळा पथकातील अधिकारी श्रीमती जाधव मैडम, पंचासमक्ष व सापळा पथकातील सदस्य यांनी संदिप चव्हाण पोलीस व माझेत रेकॉर्ड झालेले संभाषण ऐकले त्यात चव्हाण पोलीस यांनी माझेकडे माझा भाउ राहुल यास फायरिंगच्या गुन्हयात आरोपी न करता व सोडुन देण्यासाठी 2,00,000/- रुपये मागणी करुन तडजोडीअंती 1.50,000/- रुपयाची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने तात्काळ पुढिल सापळा कार्यवाही करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले होते. त्यानंतर श्रीमती गायत्री जाधव मॅडम यांनी मला लाच म्हणुन देण्यासाठीची रक्कम हजर करण्यास सांगितल्यावरुन मी माझे बचतीतील 10,000/- रुपये त्यांच्यासमक्ष हजर केले व त्यात उर्वरीत 1,40,000/- रुपयांच्या डमी नोटा टाकल्या, श्रीमती गायत्री जाधव यांनी लाचेच्या रकमेस अन्नासीन पावडर कधी लावली जाते व त्यांच्या गुणधर्माची माहीती देउन, मपोहवा / ज्योती शार्दुल यांनी त्याचे प्रात्याक्षिक करून दाखविले सदर लाचेच्या रकमेस अन्ध्रासीन पावडर लावून, माझे खिशामध्ये ठेवुन दिल्या. मला व पंच रुपवते यांना आवश्यक त्या सुचना देउन, माझेकडे व्हाईस रेकॉर्डर चालु करून देवून संदिप चव्हण पोलीस यांना भेटण्यासाठी पाठविले, त्याप्रमाणे मी व पंच श्री रुपवते असे संदिप चव्हाण पोलीस यांची भेट घेण्यासाठी एलसीबी कार्यालय अहमदनगर येथे गेलो असता कार्यालयाच्या गेटवर माझा भाउ राहुल एकटाच दिसला मला वाटले त्याला पैसे घेण्यासाठी पाठविले असेल म्हणुन मी संदिप चव्हाण पोलीस यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम घेवुन त्यांना भेटण्यासाठी कार्यालयात गेलो असता मी त्यांना बाहेर जातांना पाहिले होते व त्यावेळी संदिप चव्हाण पोलीस हे मोठ्या साहेबांसोबत गाडीवर बसुन, निघुन गेले असल्याचे समजले व मी भाउ  यास विचारले असता, त्याने त्याला सोडुन दिले असल्याचे सांगितले होते संदिप चव्हाण पोलीस व माझी भेट न झाल्याने, सदर कारवाई स्थगित करण्यात आली व त्याबाबत सविस्तर सदर सापळा कारवाई स्थगीती पंचनामा करण्यात आला आहे. त्यांनतर मला पोलीस निरीक्षक श्रीमती जाधव यांनी पुढील कार्यवाही बाबत विचारणा केली असता, मी त्यांना सांगीतले की, लोकसेवक संदिप चव्हाण पोलीस यांना माझे बाबतीत काही तरी संशय आल्याने त्यांनी माझेकडून लाचेची रक्कम स्विकारली नव्हती व माझा भाउ राहुल याचेविरुध्द कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल न करता त्यास सोडुन दिले होते त्यामुळे माझे त्यांचेकडे कोणत्याही प्रकारचे काम प्रलंबित राहिलेले नाही. त्यानंतर पासुन आज पावेतो संदिप चव्हाण पोलीस यांनी माझेशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्क साधला नाही अगर कोणत्याही प्रकारे मागणी केलेली लाच रक्कम स्विकरण्यासाठी प्रयत्न केलेला नाही. संदिप चव्हाण पोलीस यांनी माझेकडे मागणी केलेले 1,50,000/- रूपये ते आता स्विकारणार नाहीत व पुन्हा भविश्यात देखील पैशांची मागणी करणार नाहीत, अशी माझी पूर्णपणे खात्री झाल्याने, त्यांचेविरुध्द कायदेशीर कार्यवाही करा बाबत मी सांगितल्याने तसा माझा दि. 30/06/2024 रोजी सविस्तर जबाब नोंदिवण्यात आला होता, तरी लोकसेवक संदिप चव्हाण पोलीस (पुर्ण नाव माहित नाही), नेमणुक एलसीबी कार्यालय अहमदनगर यांनी दि. 22/03/2024 रोजी 12/02 ते 13/20 वाजेच्या दरम्यान एलसीबी कार्यालय अहमदनगर येथे आमचे शिर्डी येथील हॉटेलच्या पाठीमागील भागात असलेल्या पार्किंगमध्ये झालेल्या फायरिंगच्या गुन्हयात माझा भाउ यास आरोपी न करण्यासाठी व त्याने ताब्यात घेतलेल्या माझे भावाला एलसीबी कार्यालय येथुन सोडुन देण्यासाठी माझेकडे 1,50,000/- रुपये लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली म्हणुन माझी त्यांचेविरूध्द कायदेशीर फिर्याद आहे. माझी वरील फिर्याद संगणकावर टंकलिखीत करण्यात आली असुन ती मी वाचुन पाहीली ती माझे सांगणेप्रमाणे बरोबर टंकलिखीत केलेली आहे. समक्ष ही फिर्याद दिली

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button