शिर्डी प्रतिनिधी काही दिवसापूर्वी शिर्डी येथील राष्ट्रवादीचे नेते निलेश कोते यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट अपडेट केली होती कि एका कुटुंबातील संजीवनी येथे शिक्षण घेत असणारी मुलीस फूस लावून पळून नेले होते ते कुटुंब आपले सर्व कामे सोडून गेल्या १८ दिवसापासून राज्यासह परराज्यात त्या मुलीचा घेत होते त्या दरम्यान त्यांना मुलीचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता त्यांना कोणाचाही आधार राहिला नव्हता म्हणून ते माजी खासदार सुजय विखे यांच्या कडे मदतीसाठी गेले असता सुजय विखेंनी तात्काळ संबंधित अधिकारी यांना फोन लावून मुलीला शोधण्यासाठी सूचना केल्याने ती मुलगी सापडली आणि तिला सुखरूप घरी आणले दिनांक १८/०६/२०२४ रोजी ती मुलगी नेहमी प्रमाणे सकाळी संजीवनी कॉलेज कोपरगांव येथे गेली आणि १२ वाजेच्या दरम्यान तिला एका मुलाने फूस लावून पळवून नेले होते आपली मुलगी आजून घरी आली नाही म्हणून कुटुंबातील सदस्यांना चिंता वाटू लागली मुलीचा शोधाशोध त्यांनी सुरु केला संजीवनी कॉलेजला जाऊन तेथील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता ती मुलगी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान कॉलेजच्या बाहेर जातांना दिसली असता कुटुंबाचे सदस्यांनी कोपरगाव पोलीस स्टेशनला धाव घेऊन घडलेली हकीकत सांगितली असता कोपरागावच्या पोलिसांनी तात्काळ ३३६ प्रमाणे फिर्याद दाखल करून घेऊन मुलीचा शोध सुरु केला परंतु १८ दिवस झाले तरी ती मुलगी मिळत नव्हती कुटुंबातील सदस्य तिला शोधून शोधून बेजार झाले होते त्यांना काय करावे काहीच सुचत नव्हते तेव्हा त्यांनी सुजय विखे यांना भेटायचे आणि त्यांच्याकडून मदत मागायचे हे ठरवले आणि सुजय विखेंनी सुद्धा क्षणाचा विलंब न करता तात्काळ यंत्रणा हलवल्याने ती मुलगी नागपूर येथे मिळून आली आणि सुजय विखेंच्या प्रयत्नांना अखेर यश आल्याने त्या कुटुंबीयांनी सुजय विखे व पोलीस यंत्रणेचे आभार मानले
जाहिरात