राजकीय
पालकमंत्री शोधा अन् गावठी कोंबडा मिळवा!
ठाणे प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दीपक अशोक वाघघोडेने पालकमंत्री शंभुराज देसाई यांना शोधा आणि गावठी कोंबडा, वळगणीचे मासे मिळवा, असे फलक मुरबाड शहरात लावल्याने खळबळ उडाली आहे. या बॅनरचे फोटो आता व्हायरल झाले असून त्यांची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे.
जाहिरात
पालकमंत्री शंभूराज देसाई हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खास विश्वासातले म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच ते साताऱ्याचे असूनही त्यांना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई यांना ठाणे जिल्ह्याचा विभागवार दौरा करून तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याची, त्या मार्गी लावण्यासाठी सूचना करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.