अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेत गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांच्या उजव्या कानाजवळ गोळी लागल्याचा त्यांनी दावा केला आहे. मात्र, गोळीबाराच्या घटनेनंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने घटनास्थळावरून बाहेर काढले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. ट्रम्प यांच्यावर हल्ला करणाऱ्याला अमेरिकेच्या पोलीस प्रशासनातील स्नाइपरने एका घराच्या टेरेसवर बसून मारलं आहे.ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रतिक्रिया दिली. एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी त्यांचे मित्र माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. ट्रम्प यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये (एक्स) म्हटले आहे की, ”माझे मित्र माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मी चिंतेत आहे. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. त्यांनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. आमचे विचार आणि प्रार्थना पीडित, जखमी आणि अमेरिकन लोकांच्या कुटुंबियांसोबत आहेत” ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा पंतप्रधान मोदींनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.
जाहिरात