कोपरागाव येथे दोन दिवसात चौघांचे निधन
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या लक्ष्मणवाडी येथील रहिवासी व ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सांडुजी दगडू उगले (वय-८८) यांचेसह रमेश जनार्दन भाकरे (वय-६५) मारुती काकूंजी ग्राम (वय-९०),जैतूनबी महंमद शेख (वय-५५) आदी चार जणांचे दोन दिवसात निधन झाले आहे.त्यामुळे संवत्सर शिवारात शोककळा पसरली आहे.
कोपरगाव तालुक्यातील गोदावरी तीरी संवत्सर हे गाव असून त्यास मोठा धार्मिक वारसा आहे.येथील हद्दीत लक्ष्मणवाडी ही उपवाडी आहे.या ठिकाणी दोन दिवसात तीन पुरुष व एक महिला यांचे निधन झाले आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
यातील संवत्सर येथील ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सांडुजी दगडू उगले यांचे आज दुपारी ०२ वाजता निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी,नातू पणतू असा परिवार आहे.ते शेती महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी होते.दरम्यान ते गोदावरी परजणे तालुका सहकारी दूध संघाचे कर्मचारी सिद्धार्थ उगले याचे पिताश्री होते.त्यांच्यावर आज सायंकाळी ०७ वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दरम्यान दुसरा मृत्यू हा रमेश जनार्दन भाकरे यांचे निधन काल सकाळी ०९ वाजता झाले होते.यांचें निधन आज सकाळी झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,तीन मुली असा परिवार आहे.त्यांच्यावर आज सकाळी ११ वाजता गोदावरीतीरी अंत्यविधी शोकाकुल वातावरणात संपन्न झाला आहे.ते सेवानिवृत्त सैनिक अशोक भाकरे यांचे कनिष्ठ बंधू होते.नगर जिल्हा युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव यांचे चुलते होते.
तिसरा मृत्यू हा लक्ष्मणवाडी येथील शेतमजूर मारुती काकूंजी ग्राम (वय-९०) यांचे आज दुपारी ०२ वाजता निधन झाले आहेत्यांच्या पश्चात पत्नी आहे.त्यांचाही अंत्यविधी आज सायंकाळी ०७ वाजता संपन्न होणार आहे.
दरम्यान याच उपवाडीच्या रहिवासी असलेल्या जैतूनबी महंमद शेख (वय-५५) यांचे काल निधन झाले होते.त्यांच्या पश्चात दोन मुले,तीन मुली,नातू,पणतू असा परिवार आहे.त्यांचा अंत्यविधी शोकाकुल वातावरणात संपन्न झाला आहे.
त्यांच्या निधनाबद्दल गोदावरी नामदेवराव परजणे तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,संवत्सर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच सुलोचना दिलीप ढेपले,उपसरपंच विवेक परजणे,पांडुरंग शिंदे (शास्त्री),बाळासाहेब दहे,बाजार समितीचे संचालक खंडू पाटील फेफाळे,ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव साबळे,सहकार महर्षि शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर परजणे,संचालक बापूसाहेब बारहाते,कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दिलीप बोरनारे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.