पालकमंत्री राधाकृष्ण विखे खा. सुजय विखेंसह इतरांवर लोणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
पालकमंत्री राधाकृष्ण विखे खा. सुजय विखेंसह इतरांवर लोणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या डॉ. विठ्ठलराव विखे पा. सहकारी साखर कारखान्याने 191 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप होत आहे. 2 एप्रिल रोजी लोणी पोलीस ठाण्यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे व भाजपाचे नगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार त्यांचे पुत्र सुजय विखे यांच्या सहसंचालक मंडळाच्या विरोधामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे. आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहोत, जर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर आम्हाला न्यायालयामध्ये दाद मागावी लागेल, असा आरोप प्रवरा शेतकरी बचाव कृती समितीच्या सदस्यांनी केला आहे.राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या डॉ. विठ्ठलराव विखे पा. सहकारी साखर कारखान्याने 191 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप होत आहे.
2 एप्रिल रोजी लोणी पोलीस ठाण्यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे व भाजपाचे नगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार त्यांचे पुत्र सुजय विखे यांच्या सहसंचालक मंडळाच्या विरोधामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे. आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहोत, जर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर आम्हाला न्यायालयामध्ये दाद मागावी लागेल, असा आरोप प्रवरा शेतकरी बचाव कृती समितीच्या सदस्यांनी केला आहे.प्रवरा शेतकरी बचाव कृती समितीचे अरुण कडू पाटील, बाळासाहेब केरुनाथ विखे व एकनाथ घोगरे यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. यावेळी बोलताना अरुण कडू व बाळासाहेब विखे यांनी सांगितले,
विद्युलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, प्रवरानगर हा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली आहे. या कारखान्याने 19 कोटींचा मोठा घोटाळा केलेला आहे. कागदपत्रांच्या हेराफेनीने आहातातील रक्कमांच्या अदलाबदलीने, त्याचप्रमाणे वार्षिक अहवाल व ताळेबंदातून सभासद ऊत्त उत्पादकांची घोर फसवणूक करून भा. दंड विधाम 420 व इतर गंभीर कलमान्वये गुन्हे घडलेले आहेत. या संदर्भात बाळासाहेब केरुनाथ विखे पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे. त्याचप्रमाणे आजही 4 एप्रिल 2024 रोजी याच फिर्यादी संदर्भात तातडीने कार्यवाही व्हावी म्हणून पोलीस अधीक्षक राकेश ओला, नगर यांची भेट आम्ही प्रवरा शेतकरी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह घेतली आहे व फिर्यादीची प्रत त्यांना दिलेली आहे, असंही विखे यावेळी म्हणाले.जानेवारी 2023 पासून आम्ही या संदर्भात शासन दरबारी संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने तक्रारी करून त्या तक्रारीच्या संदर्भात पाठपुरवा करीत आहोत. जानेवारी 2023 मध्ये साखर आयुक्त यांच्याकडे तक्रार नोंदवल्यानंतर त्यांनी आमची तक्रार नगर येथील साखर सहसंचालकांकडे पाठविली.
या महोदयांनी सातत्याने कारखान्याकडे खुलासा मागितला. परंतु त्यांनी अधिकाराचा विशेष वापर करून काही कारवाई करणे आवश्यक होते, तसे काही न करता ते फक्त खुलासा मागत राहिले. इतकेच नव्हे तर कारखान्याचा कुठलाही खुलासा प्राप्त झाला नाही. म्हणून त्यांनी तृत्तीय लेखापरीक्षक वर्ग 1 (साखर), यानाही कारखान्याच्या या हेराफेरी संदर्भात चौकशी करण्यास सांगितले. मात्र संबंधित लेखापरीक्षक महोदय यांनी ही कारखान्याकडे लेखी देऊन फक्त खुलासा मागितला. यापलिकडे काहीही कारवाई झाली नाही कारखान्यानेही कुठली माहिती त्यांना दिलेली नाही’ असे कडू व विखे म्हणाले.
‘या संपूर्ण पार्श्वभूमीवर आम्ही आता रीतसर फिर्याद लोणी पोलीस स्टेशन येथे 2 एप्रिल 2024 रोजी दाखल केली आहे. व आम्ही त्या खात्याकडे विनंती केलेली आहे की, आपण गुन्हा नोंदवून या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून आम्हा सभासदांच्या व ऊस उत्पादकांच्या तक्रारीची दखल घेऊन त्वरीत कारवाई करावी,
अशी मागणी आम्ही केली आहे. आमची ही तक्रार लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किंवा ऐन निवडणुकीच्या तोंडावर केलेली आहे, असा कदाचित गैरसमज होण्याचा संभव आहे. पंरतु या आधी सांगितल्याप्रमाणे आम्ही जानेवारी 2023 पासून या सर्व घोटाळा व आर्थिक अफरातफरी प्रकरणी पाठपुरावा करीत आहोत. परंतु या संदर्भात आमच्या तक्रारीची संबंधित खात्याच्या एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने दखलच घेतली नाही. इतके गंभीर प्रकरण असतांना सुध्दा दखल घेत नाहीत, म्हणूनच नाईलाजास्तव आम्हाला पोलिसांकडे जाणे भाग पडले. त्यामुळे निवडणूक वगैरेशी या तक्रारीचा काहीएक संबंध नाही. ही पूर्णपणे आर्थिक भ्रष्टाचार, कागदपत्रांची हेराफेरी करून आकडेवारीत फेरफार करून आम्हा ऊस उत्पादक सभासदांच्या नजरेत धूळफेक आलेली आहे. त्याचप्रमाणे ही खोटी आकडेवारी दाखवून अनेक बँकाची गेले अनेक वर्ष फसवणूक करून बेकायदेशीर कर्ज घेतले जाते. त्यामुळे दरवर्षी या व्याजाचा भुर्दंड सभासदाच्या माथी मारला जातो. ऊसाचा दरही कमी दिला जातो, असा आरोपही त्यांनी केला आहे.