शिर्डी प्रतिनिधी / साईच्या मंदिरात अनेक दिवसांपासून हार फुले सुरू करण्यासाठी लढा सुरू होता न्यायालयाच्या आदेशानुसार ती सुरू झाली आहे त्यामुळे साईभक्त भाविकांचे आर्थिक शोषण होणार नाही याची देखील काळजी व्यावसायिक व तरुणांनी घेतली पाहिजे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी केले आहे
शिर्डीला मागिल वर्ष चागले गेले
आहे वर्षे २०२३ च्या तुलनेत विक्रमी जास्त देणगी ४१२ कोटी रुपये संस्थानला प्राप्त झाली आहे काही महाभाग अयोध्या श्री राम मंदिराशी संबंध जोडून शिर्डीत गर्दी कमी झाली असा अप्रचार करत होते थेट अयोध्येत जाऊन खात्री केली नवीन वर्षात मंदिरात हार,फुले चालू झाली त्यामुळे भाविक समाधानी आहेत साईबाबा संस्थान देखील भक्त हितासाठी धोरणात्मक निर्णय घेत आहे
अशा वेळी शिर्डी येथे आलेल्या साईभक्त भाविकांची फसवणूक व आर्थिक लुटमार होणार नाही यांचे भान ठेवणे 31 डिसेंबरला नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी झाली काही तथाकथित ग्रामस्थांनी देणगीदारच्या पुढे उभे राहून त्यांची निस्सीम साईभक्ती दाखवली दर्शनासाठी साठी पाच ते सात तास लागले पण साईभक्त समाधानी झाले संस्थानाचे कार्यकारी अधिकारी,सरक्षण अधिकारी,जनसंपर्क अधिकारी गर्दीच्या काळात स्वतः उपस्थित राहून नियोजन करत होते
कर्मचारी चागली सेवा देत होते दर्शनासाठी गर्दी झाल्यामुळे उशिरा दर्शन मिळाले तरी साईभक्त समाधानी असले तरी शिर्डी शहरात आलेला साईभक्त दोन चार दिवस कुंटबासह कसा राहिल यासाठी साईभक्त हिताचे प्रकल्प तात्काळ मार्गी लागले पाहिजे तरच शिर्डी शहरात कायम साईभक्त भाविकांची गर्दी राहील असे मत कोते यांनी व्यक्त केले