मृतांचा खच पाहून शिपायाला हार्ट अटॅक
हाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. बाबांच्या दरबारात मृतदेहांचा ढीग पडला होता. काही वेळातच संपूर्ण परिसर स्मशानभूमी बनला. या घटनेत आतापर्यंत १२१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या सत्संगाचे आयोजन नारायण साकार हरी नावाचे बाबा करत होते. बाबांकडून आशीर्वाद घेण्यासाठी एक लाखापेक्षा अधिक भाविक पोहोचले होते. हातरस दुर्घटनेच्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी जे सांगितले ते हृदय पिळवटून टाकणारे आहे. अपघात होताच हे लोक बसने घरी परतले. एका व्यक्तीने सांगितले की आमच्या आधी दोन लोकांचा मृत्यू झाला होता, आम्ही नशीबवान आहोत की आम्ही वाचलो
.हाथरस येथील दुर्दैवी घटनेनंतर क्युआरटीच्या ड्युटीवर तैनात असलेले शिपाई रवी यादव (राहणारे अलीगड) यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला आहे.
रवी यादव यांची ड्युटी मृचदेहांची व्यवस्था करण्यात लावण्यात आली होती. याबाबत माहिती देताना पोलिस अधीक्षक जगदीश चंद्र मौर्य यांनी सांगितलं की, शिपाई रवी यादव यांची ड्युटी हाथरस दुर्घटनेत मृतदेहांच व्यवस्था करण्यात लावण्यात आली होती. ड्युटी दरम्यानच त्यांना हार्ट अटॅक आला.