शिर्डी (प्रतिनिधी)
महाराष्ट्रात सध्या विधानसभेच्या निवडणुक प्रचाराचा वेग वाढला आहे.या
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महिलांबद्दल केल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
कोणत्याही राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठा राखावी .असेही केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे. प्रचाराचा वेग वाढला आहे. विविध पक्ष व उमेदवार कार्यकर्ते यांच्या सभा होत आहेत. त्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. मात्र हे करत असताना महिलांचा सन्मान राखला जावा.
महिलांची प्रतिष्ठा राखली जावी. असे त्यांनी म्हटले आहे.राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठेशी तडजोड होईल, अशा कोणत्याही कृती, सहभाग किंवा वक्तव्यांपासून दूर राहावे. तसेच, इतर पक्षांच्या नेते किंवा कार्यकर्त्यांच्या खासगी जीवनाशी संबंधित कोणत्याही मुद्द्यावर टीका करू नये.
प्रतिस्पर्ध्यांचा अपमान करण्यासाठी खालच्या पातळीवरील वैयक्तिक हल्ले टाळावेत’, अशी सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी शुक्रवारी दिली.अहिल्या नगर जिल्ह्यात संगमनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये धांदरफळ येथे डॉक्टर सुजय विखे यांच्या युवा संकल्प सभेमध्ये वसंत देशमुख यांनी जयश्रीताई थोरात यांच्या बद्दल अपशब्द वापरले होते.
त्यामुळे सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात आला होता. केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत ही माहिती गेली होती. असे कळते. केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणत्याही निवडणुकीत महिलांचा सन्मान राखला जावा ,प्रतिष्ठा राखली जावी, कोणाच्याही खाजगी जीवनाबद्दल व व्यक्तिगत टीका टिप्पणी करू नये असेही म्हटले आहे.