Letest News
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्यात! शिर्डी विमानतळावर करण्यात आला सत... पांढऱ्या कापडात गुंडाळलेल्या ५ वर्षाच्या मुलाचा मृतदेह गोदावरीच्या पात्रात मिळाला शिर्डी येथिल शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई निवृती गायकवाड... saibaba mandir news नाताळ व नवीन वर्षाच्या तयारीसाठी साईबाबा संस्थान कडून तयारी यूपी योद्धा प्रो कबड्डी लीग च्‍या टिमने श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले अपघातात मयत झालेल्या अनोळखी व्यक्तींच्या ओळखीसाठी संपर्क साधण्याचे एमआयडीसी पोलिसांचे आवाहन! शिर्डीत दोन वेगवेगळ्या घटनेत दोन साईभक्त महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने धूम स्टाईल लंपास! धूम स्ट... अहिल्यानगर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी! शिर्डीतील एका क्रीडा शिक्षिकेने पुणे महापालिकेच्या बसमध्ये दारुड्या प्रवाशाला दिला चोप! महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शिर्डीला भेट देऊन घेतले साईबाबांचे ...
अ.नगरराजकीय

शिर्डी मतदारसंघाची दहशत संपविण्याची मी शपथ घेतली आहे घोगरे ताई

कोल्हार ( प्रतिनिधी )- शिर्डी मतदारसंघांमध्ये गेली अनेक विविध सत्ता असूनही विकास पूर्णपणे रखडला आहे. येथील दहशतीचे वातावरण संपविण्याबरोबर स्वातंत्र्य बंधुभाव व निर्मळ वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असून दृष्ट प्रवृत्ती रोखण्यासाठीच सौ प्रभावती ताई घोगरे यांची उमेदवारी असल्याचे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

कोल्हार बुद्रुक येथे भगवती माता मंदिराच्या प्रांगणात प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर उमेदवार सौ प्रभावती घोगरे, करण ससाने ,सचिन कोते, रिपाईचे नेते बाळासाहेब गायकवाड, पंकज लोंढे, किरण कडू ,सचिन चौगुले, राजेंद्र अग्रवाल, संजय शिंदे, लताताई डांगे, सोमनाथ गोरे, शितल लहारे ,सुधीर म्हस्के, विजय दंडवते, राजेंद्र निर्मळ यांसह मान्यवर उपस्थित होते

.यावेळी बोलताना आ. थोरात पुढे म्हणाले की, या मतदारसंघात खासदार, आमदार, मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष पद अशी अनेक वर्ष सत्ता असूनही विकास कामे रखडली आहेत. गजक्यांचा रस्ता म्हणून प्रसिद्ध असलेला नगर मनमाड रस्ता यांना दुरुस्त करता आला नाही. साठ वर्षात एमआयडीसी बद्दल काहीच बोलले नाही .निवडणूक आली म्हणून एमआयडीसीच्या गप्पा सुरू झाल्या आहेत.

या परिसरातील वातावरण कायमच दहशतीखाली असते. ही दहशत मोडून काढण्यासाठी महाविकास आघाडीने प्रभावती ताई घोगरे यांना उमेदवारी दिली आहे.गणेश कारखान्याची परिस्थिती अतिशय वाईट करून ठेवली होती. परंतु सभासदांनी कारखाना आमच्या ताब्यात दिल्यानंतर अतिशय सुंदरपणे कारखाना चालवला .शेतकऱ्यांचे पेमेंट कामगारांचे पगार सर्व दिले. म्हणून गणेश परिसरात दिवाळी आनंदाची गेली.

या भागातील नेते संगमनेरला येऊन अतिशय खालच्या स्तरावर जाऊन टीका करतात. धांदरफळ मध्ये तर थेट महिलांचा अपमान करण्यापर्यंत त्यांचे धाडस झाले म्हणून गावातील महिलांनी सभा उधळून लावली .यांना पळता भुई थोडी झाली. यांचा सहवास लाभला की दृष्ट बुद्धी सुचते. आणि त्यातूनच देशमुख हा दृष्ट बुद्धीने बोलला. आणि तालुक्यात मोठा उद्रेक झाला.
गणेश, राहुरी कारखाना, सहकारी दूध संघ हे बंद पडण्याचे काम यांनी केले.

संगमनेर तालुक्यात येऊन जाती-धर्माचे राजकारण करून संगमनेरची शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु संगममेर तालुका अशा प्रवृत्तीला कधीही थारा देत नाही. म्हणूनच आजच्या स्थितीला तालुक्यात आठ हजार कोटीच्या ठेवी आहे. बाजारपेठ फुललेली असते. ही प्रगती या नेत्यांना पाहवत नसल्याने संगमनेरला येऊन म्हणाली की अमृतवाहिनी शाखा का काढली, मी त्यांना ठामपणे सांगतो की या भागातील लोकांना न्याय देण्यासाठीच ही शाखा काढण्यात आली आहे.


मी महसूल मंत्री असताना आमदार ससाणे यांना बरोबर घेऊन श्रीरामपूरचा खंडकरी प्रश्न मार्गी लावला .त्यामध्ये शेतकऱ्यांच्या व खंडक-याच्या हिताचेच निर्णय घेतले गेले. निळवंडे धरणाचे काम करत असताना धरणग्रस्तांसाठी प्रसंगी स्वतःची जमीन दिली .परंतु येथील नेत्यांनी कायम धरणाच्या कामात अडचणी निर्माण करण्याचे काम केले. हे महसूल मंत्री असताना सध्याचे वाळू धोरण पूर्णपणे फसले आहे. ग्रामीण भागात लोकांना घर बांधण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहे. हा प्रश्न मी अनेक वेळा विधानसभेत विचारला तर त्याला उत्तरही दिले नाही .


आता आपल्याला बदल घडवायचा आहे व महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती ताई घोगरे यांना जनतेमधून मोठा प्रतिसाद मिळत लोक दडपशाही खाली असले तरी मोठे मताधिक्य घोगरे ताई यांना मिळणार आहे सर्वांनी आपसातील मतभेद विसरून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एकजुटीने काम करा आम्ही पाठीशी आहोत असे ते म्हणाले. सौ.प्रभावती घोगरे म्हणाल्या की, माझे वडील राजकारणात असल्यामुळे मला राजकारणाचा वारसा आहे .

शिर्डी मतदारसंघाची दहशत संपवण्यासाठी मी शपथ घेतली आहे .मला उमेदवारी मिळू नये म्हणून अनेक प्रयत्न केले गेले परंतु आमदार बाळासाहेब थोरात हे माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याने मला उमेदवारी मिळाली .शिर्डी मतदारसंघांमध्ये अनेक विकास कामे प्रलंबित आहे ते पूर्ण करण्यासाठी माझी उमेदवारी आहे. गेली 35 वर्ष तुम्ही जे केले नाही ते मी पाच वर्षात करणार आहे आणि शिर्डी मतदार संघाला भयमुक्त करण्याचा संकल्प मी केला आहे.

याप्रसंगी बाळासाहेब गायकवाड, करण ससाने , सुरेंद्र खर्डे, सचिन चौगुले,आदींसह विविध नेत्यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी कोल्हार व परिसरातील नागरिक युवक महिला व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button