पालक व शिक्षकांनी आपआपली जबाबदारी सांभाळली पाहिजे—पोलीस निरीक्षक वासुदेव देसले
शिर्डी (प्रतिनिधी) भविष्यात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी व पालकांनीही आपापली जबाबदारी सांभाळत कायद्याचा अभ्यास करत अन्यायविरुद्ध लढले पाहिजे. असे मत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सौ पारे मॅडम उपस्थित होत्या.
कोपरगाव तालुक्यातील साकरवाडी येथील सोमैय्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
साकरवाडी येथील सोमैय्या विद्यालयात नुकत्याच जिल्हास्तरीय टेबल टेनिस शालेय स्पर्धा संपन्न झाल्या.या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषक समारंभ यावेळी संपन्न झाला. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींना कायदा, नियम यांची माहिती सांगितली. बालका विरुद्ध होणारे अपराध, तसेच सायबर क्राईम याबाबत माहिती देऊन शाळा परिसरात शांतता व सुरक्षित राहावी ,म्हणून शाळा व्यवस्थापन, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी आपापली जबाबदारी सांभाळली पाहिजे. पोलीस आपले कर्तव्य बजावत असतात मात्र पालकांनीही त्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. भविष्यात मुलांना यशस्वी होण्यासाठी शिक्षकांप्रमाणेच पालकांची ही जबाबदारी आहे.
विद्यार्थ्यांनी जिद्द ठेवून शिक्षणाबरोबरच आपल्या कलागुणांना वाव दिला पाहिजे. असे यावेळी पो.नि. वासुदेव देसले यांनी सांगितले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.