शिर्डी( प्रतिनिधी) साईबाबा संस्थान शिर्डी हे देशभरातून साई दर्शनासाठी आलेल्या साई भक्तांना मोफत अन्न प्रसाद भोजन देत असते त्यासाठी साईबाबा संस्थान वर्षाकाठी त्यासाठी ९३ कोटी रुपये खर्च करत असते वर्षभरात भक्त देणगी व्हीआयपी अन्न खरेदी व्याज यामधून जवळजवळ साईबाबा संस्थानला २००कोटी रुपये देत असतात मोफत अन्न दिले तरी संस्थांना दरवर्षी १०० कोटी रुपयांचा नफा होतो अन्नदान फंड केवळ अन्नदानासाठीच वापरावा लागतो तो इतर ठिकाणी खर्च करता येत नाही अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी दिली माजी खासदार सुजय विखे यांनी शिर्डीत नुकतेच भोजन प्रसादासाठी सशुल्क २५ रुपये आकारणी करा असे वक्तव्य केले होते त्यावर बोलताना काळे म्हणाले की पंचवीस रुपयाची आकारणी केली तरी साईभक्त प्रसाद घेणारच आहे पण संस्थांना अन्य विकून आणखी पैसे मिळतील व त्यामधून न खर्च करता येणारा अन्नदान फंड देखील वाढेल कदाचित अन्नदान फंड खर्च न झाल्यास संस्थांवर मोठी कर आकारणी देखील होईल साईबाबा हयात असताना ते फकीर असताना अन्नदान मोफत करीत होते ही परंपरा संस्थान अनेक वर्षांपासून अविरतपणे राबवत आहे प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयपतीप्रमाणे गरिबांना अन्नदान करावेसे वाटते त्यामुळे फक्त अन्नदान फंडातच देणगी टाकतात हे वास्तव्य अन्नदान बंद करताना प्रत्येकाने व साईबाबा संस्थानच्या व्यवस्थापनाने देखील लक्षात घेतले पाहिजे साईबाबा संस्थान कडे मार्च २०२३ शिल्लक ६११ कोटी ७२ लाख ,९२,०६२रुपये प्राप्त देणगी २०२४,९६ कोटी ,६८,५०हजार ,२१७ रुपये वार्षिक उत्पन्न २०२४
४६ कोटी ,२४ लाख १८२३६,
रुपये अन्नदान ठेवी वरील प्राप्त व्याज २०२४ ४६ कोटी २०३६३रुपये इतर रूपांतरीत देणग्या २०२४
५ कोटी ,१० लाख रुपये
एकूण अन्नदान फंड जमा २०२४
८०० कोटी ,७० लाख ९०९१९
रुपये अन्नदान एकूण खर्च २०२४
९३ कोटी ,१० लाख ५७४२९
रूपये३१ मार्च २०२४ अखेर अन्नदान फंड शिल्लक..
७०७ कोटी ,६० लाख ३३४९०
रुपये असल्याचे काळे यांनी सांगितले
जाहिरात
DN SPORTS