शिर्डी प्रतिनिधी
शिर्डीच्या साई मंदिरात कोविड काळात भाविकांना हारप्रसाद, फुले नेण्यास बंदी करण्यात आली होती ती बन्दि आजपर्यंत सुरु आहे. त्यामुळे भाविकांना फक्त दर्शनावर समाधान मानावे लागत होते परंतु साई समाधी व बाबांच्या चरणी फुले किंव्हा हार अर्पण करण्याची अनेक भाविकांची इच्छा असते मात्र प्रशासनाच्या निर्णयामुळे त्यांना नाराजीचा सामना करावा लागत होता. याविषयी शिर्डीतील काही तरुणांनी आंदोलन केले होते तर शिर्डीतील दिगंबर कोते यांनी सात दिवस उपोषण सुद्धा केले होते, परिणामी एक दिवस काही तरुणांनी आंदोलन करत मंदिरात फुले नेण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्या बद्दल गुन्हा देखील दाखल झाला होता.
हार प्रसादाच्या नावाखाली भाविकांची लूट होते व त्यामुळे शिर्डीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे असा समज ग्रामस्थ्यांचा झाला होता व यावर तोडगा काढण्यासाठी ना. विखे यांच्या बरोबर सर्वपक्षीय ग्रामस्थ्यांची चर्चा झाली मात्र त्यातून मार्ग निघाला नाही व सदर प्रश्न न्यायालयात गेला.परिणामी शिर्डी आणि परिसरातील अडीचशे एकर फुलशेती आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते तसेच यामध्यमातून हातावर फुलांचे गुच्छ व हार प्रसाद विकणाऱ्या व्यावसायीकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे ही बाब जेंव्हा सुजय विखे यांच्या लक्षात आली
तेंव्हा त्यांनी स्वतःच्या खर्चाने मा. उच्च न्यायालय औरंगाबाद येथे केस दाखल केली या प्रकरणाची न्यायालयाने दखल घेत भाविकांना मंदिरात हार फुले वाहण्यासाठी संमती दर्शविली होती व त्या अनुषंगाने यावर साई संस्थांनला आपले म्हणणे सादर करण्यास दोन आठवड्याची मुदत दिली होती, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साई संस्थांनने आपले म्हणणे सादर केले असून त्यांनीही भाविकांच्या श्रद्धेचा विचार करत मंदिरात हार, फुले वाहन्यास संमती दर्शविली आहे. एकंदरतीच 12 जुलै रोजी यावर मा. उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय होण्याची शक्यता असून फुलशेती करणारे शेतकरी, हारप्रसाद, फुले विकणारे व्यावसायिक यांच्यासाठी येणारा निर्णय दिलासदायक व आनंदाचा ठरणार आहे.
या सर्व प्रक्रियेमध्ये सुजय विखे यांचे मोलाचे योगदान असून 12 जुलैच्या निकालानंतर शिर्डीतील हारप्रसाद, फुले विकणाऱ्या तरुणांचे नेतृत्व करणारे मा. नगरसेवक सुरेश आरने हे डॉ. सुजय विखे यांची पेढेतूला करणार असल्याच जाहीर केलं आहे. तर अनेकांनी त्यांची मिरवणूक काढण्याची तयारी व नियोजन केलं आहे.
राजकारणाच्या पलीकडे जाऊन आमच्या गोरगरीब जनतेच्या हितासाठी जो नेता निर्णय घेत असेल तर त्यांचा सन्मान करण आमचा धर्म समजतो म्हणून आम्ही सुजय विखे यांचा जंगी सत्कार व पेढेतूलाचा कार्यक्रम करणार आहोत. सुरेश आरणे , मा. नगरसेवक शिर्डी.