खरं तर वर्ल्ड कप अमित शाहांचे पुत्र जय शाह यांनी जिंकला आहे खेळाडूंचा सान्मान करताना घडल्याची टीका आझाद यांनी केली
वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यानंतर चार दिवस वादळामुळे बार्बाडोसमध्ये अडकलेला भारतीय संघ गुरुवारी (4 जुलै 2024 रोजी) पहाटे भारतात दाखल झाला. आधी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर ब्रेकफास्ट केल्यानंतर सायंकाळी मुंबईमध्ये चाहत्यांच्या उपस्थितीत विजयोत्सव साजरा केल्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये संपूर्ण संघाचा सत्कार करण्यात आला.
मात्र या संपूर्ण सोहळ्यादरम्यान अनेक चाहत्यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे पदाधिकारी उगाच प्रकाशझोतात येत लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होते असं वाटलं. याच मुद्द्यावरुन 1983 साली भारताला पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या संघातील माजी क्रिकेटपटूने संताप व्यक्त करत बीसीसीआयचे सचीव जय शाह तसेच संस्थेचे अधिकारी असलेल्या राजीव शुक्ल यांचा उल्लेख करत निर्ल्लजपणे संधीसाधूपणा केल्याचा घणाघात केला आहे.,,
लोकसभेमध्ये पश्चिम बंगालमधील बर्धमान दुर्गापूर येथून चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांनी वानखेडेवरील सोहळ्यातील दोन फोटो शेअर करत बीसीसीआयच्या पादाधिकाऱ्यांवर निशाणा साधला आहे. जगभरामध्ये कुठेही घडत नाही असा विचित्र प्रकार भारतात खेळाडूंचा सान्मान करताना घडल्याची टीका आझाद यांनी आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवरुन केली आहे.
“खरं तर वर्ल्ड कप अमित शाहांचे पुत्र जय शाह आणि राजीव शुक्ल यांनी जिंकला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि भारतीय संघ हा केवळ सहाय्यक होते,” असा उपहासात्मक टोला किर्ती आझाद यांनी लगावला आहे.