राहता प्रतिनिधी/ / राहता शहरात मध्यवर्ती असलेल्या भागातील छत्रपती काॅम्पलेक्स तळमजल्या समोर माझा भाऊ मयत गणेश भाऊसाहेब कसाब वय ४२ रा नवनाथ नगर राहता यांचा कोणीतरी अज्ञात कारणांमुळे जबर मारहाण करुन जखमी करत गळा आवळून ६नोव्हेबर २०२४ रोजी सकाळी ७ वाजेच्या अगोदर खुन केल्याची फिर्याद मयताचा भाऊ संतोष भाऊसाहेब कसाब वय ४० राहणार राहता याने राहता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे
घटनेचे गांभिर्य लक्षात येताच श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे उपविभागीय अधिकारी शिरिष वमणे पोलीस निरीक्षक रणजित गंलाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन बारकाईने पहाणी केली मयताला शवविच्छेदनासाठी राहता ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून राहता पोलीसांनी गुन्हा रजिस्टर नंबर ५२९/२०२४भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला
असून दोन संशयित इसमाना तात्काळ राहता पोलीस पथकाने ताब्यात घेतले असून पुढील तपासात व चौकशी मध्ये खुनाचे कारण व यात आणखी कोण सहभागी आहे यात कोणते शस्त्र वापरण्यात आले या सर्व बाबीवर आधिक प्रकाश पडेल असे पोलीस निरीक्षक रणजित गंलाडे यांनी सांगितले या घटनेनंतर राहता शहरात मोठी खळबळ उडाली असून भर निवडणुकीच्या काळात खुना सारख्या घटना घडत असल्याने राहता शहरात मोठ्या प्रमाणावर घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे