शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे पाच दिवस शिल्लक असताना महविकास आघाडी व महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आपापसातील मतभेद आता चव्हाट्यावर येत असून अनेक कार्यक्रमात व प्रचार सभेत हे चित्र दिसून येत आहे. राष्ट्रवादी ( शरद पवार गट ), शिवसेना (उध्दव ठाकरे गट ) व काँग्रेस या तीनही पक्षाचे शिर्डी मतदार संघातील पदाधिकारी मोजून मापून काम करत आहे.
तर काहीजण वरिष्ठांच्या समाधानासाठी तुरळक ठिकाणी हजेरी लाऊन फोटो सेशन करून आपली उपस्थिती दाखवत आहेत तर ठराविक तळमळीचे पदाधिकारी व कार्यकर्ते रखरखत्या उन्हात प्रचार करत आहेत हीच परिस्थिती महायुती अर्थात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ), शिवसेना ( शिंदे गट ), आरपीआय यांची सुध्दा आहे कारण महायुतीचे शिर्डी मतदार संघातील अनेक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारात मग्न आहेत तर महाविकास आघाडी व महायुती च्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यातील आपापसातील मतभेद मिटविण्यासाठी कोणत्याही मोठ्या नेत्याला यश आले नाही.
त्याच उदाहरण म्हणजे कोपरगावच्या बीजेपीच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बिपीन कोल्हे, विवेक कोल्हे हे अजूनही प्रचार मोहिमेत सहभागी झाले नसल्याने खा. सदाशिव लोखंडे यांचे चांगलेच टेन्शन वाढले आहे. तर खुद्द शिर्डीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर, विजय काळे, राष्ट्रवादीचे कपिल पवार, बीजेपीचे व ठराविक पदाधिकारी प्रचार मोहिमेत असून या प्रक्रियेत अनेकांनी कट मारला असल्याने उमेदवाराची धाकधूक वाढऊन दिली आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे मोठ्या नेत्यांचे आतून होत असलेले राजकारण आणि त्यासंधर्भात कार्यकर्त्यांना दिलेले गुप्त आदेश यामुळे महायुती व महाविकास आघाडीच्या या दोनही उमेदवारांना क्रॉस व्होटिंग ला सामोरं जावं लागणार असून हि दुरंगी लढत अतिशय चुरशीची ठरणार असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष शिर्डी लोकसभा निवडणुकीकडे लागले आहे. शेवटी मतदार राजाचा कौल महत्वाचा ठरणार असून या चुरशीच्या लढतीत नेमकी कोण बाजीगर ठरणार हे ४ जुनलाच स्पष्ट होईल.
नगर दक्षिण लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना महायुतीचा घटक पक्ष असलेल्या आरपीआय पक्षाने पाठिंबा दिला आहे तर उत्तरेत शिर्डी मतदार संघात प्रचार मोहिमेत अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी व आरपीआय पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी म्हणावे इतके सक्रिय नाही