शिर्डीत पोलिसांच्या नाकावर टिच्चून गुन्हेगारांनी काढले डोके वर जिल्हा पोलिस अधीक्षक अजूनही भेट देईना काय असेल बरे अडचण!!
शिर्डी प्रतिनिधी
शिर्डी ही साईबाबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे येथे देश विदेशातून साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो साईभक्त साईबाबांच्या चरणी साईबाबांवर आस्था असल्याने नतमस्तक होण्यासाठी येत असतात आणि त्यासाठी श्री साईबाबा संस्थानचे शेकडो कर्मचारी साईभक्त यांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत तसेच गृह विभागाने सुद्धा शिर्डीत मोठे पोलीस तैनात केलेले आहेत आणि संस्थानच्या अति कर्तव्यदक्ष व सच्चे साईभक्त असलेले संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश व संस्थानचे कार्यकारी अधिकारी यांनी विशेष प्रयत्न करून शिर्डीत येणाऱ्या भाविकांना सुरक्षा असावी म्हणून लाखो रुपये दरमाह खर्च करून विशेष पोलीस यंत्रणा तैनात केली आहे तसेच संस्थानला स्वतंत्र पोलिस निरीक्षक देऊन साईभक्त यांची सुरक्षेची जबाबदारी पार पाडत असतांनाही शिर्डीत साईभक्त हे असुरक्षित असल्याचे अनेक उदाहरणं हया दरम्यान घडल्येल्या घटनांमधून दिसून येत आहेत साईभक्त यांचे मंदिरात व मंदिर परिसरातून पाकिट मारले जाणे साईभक्त महिलांचे गर्दीच्या ठिकाणी चैन ओढून नेने भक्तांच्या गाड्यांचे काचा फोडून गाडीतील सामान चोरी जाणे शिर्डीत बाहेरून आलेले व शिर्डीत पॉलिसी करणारे व काही वाहन चालकांकडून साईभक्त यांना मारहाण होणे साईभक्त यांना लुटणे हे घडत असल्याने ही साईभक्त यांच्यासाठी तैनात असलेली यंत्रणा सपशेल ठरली आहे
शिर्डीत अनेकदा गुन्हेगार असणाऱ्या मुलांकडून दिवसा ढवद्या खून खुनाचे प्रयत्न रिव्हॉल्वर सापडणे हे नित्याची बाब झालेली आहे जानू काय हे गुन्हेगार प्रशासनाला आव्हान देत असल्याचे दिसून येत आहेत प्रशासन कितीही अलर्ट असले तरी हया गुन्हेगारांचे मनसुबे थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाहीत
आज भर बाजारात साईभक्त यांची चहल पहल ज्या रस्त्याने सुरू होती आणि विशेष म्हणजे आज शिवजयंती असल्या कारणाने तगडा पोलीस बंदोबस्त असताना भर चौकात एका गुन्हेगारांच्या टोळीने चक्क तलवार व हत्यार हातात घेउन परस्पर टोळीतील काही गुंड्यांवर सशस्त्र हल्ला केला आणि विषेश म्हणजे हे गुन्हेगार सीसीटिव्ही कॅमेरे मध्ये कैद झालेले आहेत शिर्डीत कमी असलेले पोलिसांचे संख्याबळ तरी पोलीस यंत्रणा सुद्धा अलर्ट झालेली दिसली दिनांक 19/ 2 /2024 रोजी सायं 06/00 वाजता चे सुमारास हॉटेल सावता लॉज जवळील बोल पालखी मार्ग शिर्डी येथे फिर्यादी सुदर्शन शशिकांत वाणी वय २४ राहाणार साकुरी शिर्डी हे फिरत गेले असता तेथे फिर्यादीचे ओळखीचे निखिल महादेव सोनवणे आर्यन राजकुमार पाटील प्रदीप सुनील सोनवणे यांनी फिर्यादीत शिवीगाळ करून लथाबुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीचे खिशातील मोबाईल व पैसे बळजबरी काढण्यास सुरुवात केली असता फिर्यादी मजकूर यांनी त्यांना विरोध केला असता त्यांनी फिर्यादीस यांचे कडील तलवार चॉपरने फिर्यादीचे कपाळावर डाव्या हातावर पार्श्वभागावर व कमरेवर वार करून फिर्यादीस जखमी केले आहे व फिर्यादी पळून जात असताना आरोपी मजकूर यांनी हत्यार घेऊन त्याचा पाठलाग केला वगैरे मजकूरचे फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर शिर्डी पो.स्टे गुरनं – l 90/2024 भादवि कलम 327,323,504,34, भारतीय हत्यार कायदा कलम 4/ 25 , महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1)(3) सह १३५ प्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी वमने व पोलीस निरीक्षक बालकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय संभाजी पाटील हे करीत आहेत
परंतु ह्या पावन नगरीत आलेल्या ज्या साई भक्तांनी हे सर्व घडत असताना बघितले आणि भयभीत झाले ते पुन्हा शिर्डीत येतील का आणि ते शिर्डीतून आपल्या गावी गेल्यानंतर दुसऱ्या साईभक्त यांना शिर्डीला जाण्यासाठी सांगतील का हा मोठा प्रश्न हया निमित्ताने शिर्डीकरांसमोर अनेकदा उभा राहिलेला आहे पोलीस काही प्रमाणात आपले कर्तव्य चोखपणे बजावतात परंतु यातही काहीं कांजीचे कपडे वाल्यांचा दबाव येतो परंतु काहीवेळेस ह्या कांजी वाल्यांचा दबावाला न जुमानता कारवाई करतात परंतू कायद्यात फार काही प्रमाणात हया गुन्हेगारांनी केलेल्या गुन्ह्यांना सजेची तर्तुत नसल्याने कोर्टाचा नाईलाज होतों आणि हे गुन्हेगार सहज सुटून आल्याने त्यांचे धेयऱ्य वाढते आणि आजुन तो गुन्हेगार जोमात गुन्हेगारी कडे वढतो ह्यासाठी अहमदनगर ला होऊन गेलेले पोलीस अधीक्षक विश्वासराव नागरे किंवा कृष्ण प्रकाश सारखे सिंघम अधिकारि नेमून राज्याच्या गृह विभागाने शिर्डीच्या सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे झाले असल्याचे साईभक्त बोलत आहेत.
हि घटना ज्या लोकांनी समक्ष बघितली त्या लोकांच्या म्हणण्यानुसार फिर्यादीने सावता मंदिर च्या बाजूला असलेली मटक्याची पेढी लुटली आणि तो पळून जात असतांना यातील तिघा आरोपींनी त्यास पकडल्याने दोघांमध्ये वाद विवाद झाल्याची कुजबुज आहे आणि त्यातून हा प्रकार घडला असल्याची चर्चा आहे हे सत्य आहे की असत्य हे पोलिसांच्या चौकशीत समोर येईलच परंतु अश्या घटना शिर्डीत घडल्याने शिर्डीची बदनामी होत आहे हे मात्र खरे