शिर्डी नगरपालिकेच्या पथकाच्या छाप्यात गोडाऊन मध्ये ट्रक भर सापडलेला बंदी असलेला प्लॅस्टिक पिशव्यांचा माल बाबत उलट सुलट चर्चाना आले उधाण !
शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डी नगर परिषदने काल बुधवारी शिर्डी येथिल प्रतिष्ठित व्यापारी यांच्या दुकानावर आणि गोडाऊन वर छापा टाकून लाखो रुपयांचे अनाधिकृत व बंदी असलेले असलेले प्लास्टिक जप्त करून मोठी कारवाई केली असता त्या दुकान व गोडाऊनच्या प्रतिष्ठित व्यापारी यांनी एका यू ट्यूब चॅनल ला मुलाखत देताना म्हटलें आहे की, हे प्लास्टिक अधिकृत आहे .याची मी जी.एस.टी. भरतो. त्याचे माझ्याकडं बिले आहेत . मात्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमा पेक्षा काही पातळ प्लास्टिक पिशव्या माझ्या गोडाऊनमध्ये यवेळी छापा मध्ये सापडल्या. त्या चुकून राहिल्या गेल्या होत्या.
त्या फेकून देणे गरजेचे होते मात्र त्या तशाच राहिल्या. त्याचा दंड मी भरण्यास तयार आहे. मात्र इतर प्लास्टिक पिशव्या व साहित्य हा नियमात आहे. तो मला परत मिळावा व जो गोडाऊनमध्ये बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा माल चुकून राहिला त्याच्याबद्दल दंडात्मक कारवाई करावी. असे म्हटले आहे. त्यामुळे या छाप्याच्या घटने संदर्भात नागरिकांमध्ये आणखीन उलट सुलट चर्चा वाढली आहे. जर अधिकृत व शासनाच्या नियमाप्रमाणे प्लास्टिक पिशव्या या छाप्यात या दुकानात असत्या तर त्या नगरपालिकेच्या पथकाने एक ट्रक भरून जप्त केल्या नसत्या. किंवा त्या जर अधिकृत आहेत तर मग नगरपालिकेच्या पथकाच्या कर्मचाऱ्यांवर या व्यापाऱ्याने गोडाऊन मधून माल जप्त करून नेताना त्याच वेळेस विरोध करणे गरजेचे होते. किंवा त्याबद्दल पोलीस स्टेशनला कळवणे गरजेचे होते ,
तसे का केले गेले नाही.असा सवाल आता पुढे येत आहे. मुळातच बंदी असलेली पातळ पिशव्यांची एक गोणी असो किंवा शंभर गोण्या असो! ती गोडाऊन मध्ये सापडली तर तो कायदेशीर गुन्हाच आहे.
याचा अर्थ असा होतो की हिंदीत एक म्हण आहे चोरी तो चोरी उपरसे शिरजोरी! म्हणजे एकतर लपून छपून शासनाने बंदी घातलेल्या पातळ पिशव्यांची चढ्या भावाने विक्री करायची आणि वरुन म्हणायचे की चुकून ह्या काही प्लास्टिक पिशव्या गोडाऊन मध्ये राहिल्या.व काही प्लास्टिक पिशव्या ह्या अधिकृत आहे.
जर हे प्लास्टिक अधिकृत होते. तर या मालकाने पोलिस स्टेशनला अधिकृत ह्या नगर परिषद चे लोकांवर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. तसे न करता आपण कसे अधिकृत आहे. हे दाखवण्याचा फक्त मुलाखत देऊन दाखवण्याचा प्रयत्न केला.व त्यातून शहरातील लोकांना सन्देश देण्याचा प्रयत्न केला की, मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली! पण नगरपालिका व नगरपालिकेचे कायदेशीर पथक हे सर्व काही कायद्याने करत असते.
जर शासनाच्या नियमाप्रमाणे ह्या प्लास्टिक पिशव्या, साहित्य असते तर नगरपालिकेने ते जप्त केले नसते. ट्रक भरून ते नेले नसते. जर शासनाच्या नियमाप्रमाणे प्लास्टिक पिशव्या असत्या तर त्याच वेळेस या मालकाने नगरपालिकेच्या या पथकाला विरोध करणे भाग होते. मात्र तसे झाले नाही. नंतर फक्त आपण साव आहोत असा आव आणण्याचा प्रयत्न करणे हे कितपत योग्य आहे. जर नगर परिषदेचे कर्मचारी दुकानात गोडाऊन मध्ये येतात. सर्व पाहणी करून छापा टाकतात. ट्रक भर मला जप्त करतात. यापूर्वी दोनदा असे छापे टाकले आहेत. असे असताना 90% माल हा अधिकृत आहे व काही पातळ प्लास्टिक पिशव्यांच्या गोण्या चुकून गोडाऊनमध्ये राहिल्या. त्याचा आपण दंड भरण्यास तयार आहोत. ती आपली चूक झाली असे एका बाजूला मान्य करणे व दुसऱ्या बाजूने आपण असे करत नाही. असे छातीठोकपणे सांगणे हे कितपत खरे की खोटे अशी चर्चा आता नागरिकांमध्ये होत आहे . त्यामुळे शिर्डी नगरपालिका व नगरपालिकेचे पथक खरे की हा व्यापारी सांगतो ते खरे! अशी चर्चाही आता होत आहे.
त्यामुळे दूध का दूध !पाणी का पाणी हे उघड होणे गरजेचे आहे. विनाकारण नागरिकांच्या आरोग्याला व शिर्डी सारखे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्राच्या शहराला खेळवणे हे योग्य नाही. ज्याची चूक छोटी असू या मोठी चूक असो. छोटा गुन्हा वा मोठा गुन्हा त्याच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. नगरपालिकेने जर 90% प्लास्टिक पिशव्या किंवा साहित्य हे शासनाच्या नियमाप्रमाणे असेल तर ते नेले कसे व तसे जर नसेल तर मग या व्यापारी कडून मुलाखती द्वारे आपले 90% साहित्य हे अधिकृत व जीएसटी भरलेले असल्याचे सांगणे हे खरे की खोटे! या सर्व गोष्टींची शहनिशा नगरपालिकेने तसेच शासनाच्या संबंधित विभागाने करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यांमध्ये प्लास्टिक छोट्या पातळ पिशव्यांना बंदी केली आहे. शिर्डीतर आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे. स्वच्छ शहर सुंदर शहर बनवण्यासाठी अहोरात्र नगरपालिका ग्रामस्थ, विविध संस्था सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. त्यामुळे कोणी कितीही मोठा असो शिर्डी शहरामध्ये अनधिकृत बंदी असलेल्या पातळ प्लास्टिक पिशव्या साठवण करणे, विक्री करणे ,वाहतूक करणे, हा गुन्हा आहे व गुन्हा कोणताही छोटा वा मोठाअसो! तो गुन्हाच असतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. कायद्यापुढे सर्वसामान आहेत व कायदा मोडला तर कारवाई झाली पाहिजे. असे साईभक्त व नागरिकांमध्येही चर्चा आहे.