शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी मध्ये व परिसरातही धूम स्टाईल महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून चोरी करण्याचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. शिर्डीत नुकतेच असे प्रकार घडले आहेत.
भुसावळ येथील नेहा रविंद्र इंगळे या साईभक्त महिलेने शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की,दि. 13/12/2024 रोजी सायंकाळी 06/30 वा.चे.
सुमारास मी व सिद्धान्त राजु जोगदंड असे दोघेजण श्री साईबाबा समाधी मंदीर शिर्डी येथे दर्शनाकरीता आलो व हॉटेल क्लासीओ स्वीट्स या ठिकाणी थांबलो होतो. व तेथून रिलायन्स मॉल मध्ये खरेदी करून रात्री 08/30 वा. च्या सुमारास मनमाड ते नगर रोडने ट्रॅन्डस मॉल शेजारी पंचरच्या दुकानाजवळून मी व सिद्धान्त राजु जोगदंड असे साईबाबा मंदीराकडे पायी जात असतांना अचानक आमचे पाठीमागुन दोन इसम मोटारसायकलवर आले व त्यातील पाठीमागे बसलेल्या काळ्या रंगाची जॉकेट घातलेल्या इसमाने तोंडाला रुमाल बांधलेला होता
माझ्या गळ्यातील चाळीस हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन ओढून घेऊन गेला. तेव्हा माझ्या चैन मधील पॅन्डल खाली पडले परंतु लाईट गेली असल्याने आम्हाला त्या मोटारसायकलचा नंबर दिसला नाही. ते भरधाव वेगात पुढे निघुन गेले. तरी माझी अनोळखी दोन चोरट्याविरुद्ध कायदेशिर फिर्याद आहे. या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर682/ 2024 नुसार भादवि कलम 3(5)/309(4 )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
त्याचप्रमाणे
बेंगलोर येथील महिला साई भक्त त्रिवेणी मंजीनाथ गुप्ता यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की,दि. 12/12/2024 रोजी सायंकाळी 07/30 वा.चे. सुमारास आम्ही बेंगलोर येथुन रेल्वेने शिर्डी येथे साईबाबा समाधी मंदीरचे दर्शनासाठी निघालो. व दि. 13/12/2024 रोजी दुपारी 02/30 वा. आम्ही कोपरगाव येथे उतरून शिर्डी ला आलो. व कर्नाटका भवन शिर्डी येथे मुक्कामी थांबलो होतो. दि. 15/12/2024 रोजी पहाटे
03/30 वा. चे. सुमारास श्री साईबाबा समाधी मंदीर चे दर्शनासाठी कर्नाटका भवन येथून मंदीरात गेलो व दर्शन झाल्यानंतर 07/30 वा.चे. सुमारास मी व माझे पती मंजीनाथ सत्यनारायण गुप्ता, व आमच्या सोबत दर्शनासाठी आलेले कोनामा, सुनितामा असे आम्ही शिर्डी ते पिंपळवाडी रोडने जात असतांना दत्तनगर जवळ अचानक एक मोटारसायकल येऊन थांबली व त्यातील त्यावर पाठीमागे बसलेला इसम खाली उतरला व त्याने माझ्या जवळ येऊन माझ्या पाठीमागुन येऊन माझ्या गळ्यातील तीन तोळ्याचे सुमारे
90 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र बळजबरीने ओढूणतोडून चोरून घेऊन गेला. अशा आशयाची फिर्यादी वरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 685 भादवि कलम 3 (5)/ 30 9 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही घटनेचा तपास शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करत आहेत.