शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी शहरात शिर्डी नगरपालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शहरात व उपनगरात स्ट्रीट लाईट बसवण्यात आले आहे घटन९ जुलै रोजी शिर्डी शहरातील स्मशानभूमी रोडवर असलेल्या हॉटेल साई संगम लगत असलेल्या चौकाजवळ स्ट्रीट लाईट पोल मध्ये मध्ये सायंकाळी पाऊस शिर्डीत झाल्यानंतर विजेचा प्रवाह उतरल्याने एका मेंढीपालन करत असलेल्या गायकवाड नावाच्या शेतक-याच्या दोन शेळ्या पंधरा हजार रुपये किमतीच्या मृत्युमुखी पडल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे शिर्डी शहरात मोठी खळबळ उडाली आहे शिर्डी शहरात असलेले अनेक स्टिट लाईट बंद पडलेले असून त्यावरील असलेले लाईट देखील मोठ्या प्रमाणावर बंद पडलेले आहे मेनरोड नगर मनमाड रोड भोजणालय कनकुरी रोड उपनगर देखील अपवाद नाही शिर्डी नगरपरिषदेच्या संबंधित विभागाकडून त्याकडे गंभीरपणे बघितले जात नसल्याने अनेक ठिकाणी अंधाराचे साम्राज्य असताना आता त्यात पोल मध्ये विजेचा प्रवाह उतरत असल्याने व जीवितहानी व दुर्घटना घडत असल्याने शिर्डी नगर परिषदेने तात्काळ दाखल घेऊन ज्या ठिकाणी अशा पद्धतीने तांत्रिक अडचणी आहेत याकडे लक्ष देऊ भविष्यात कुठेही अनुचित घटना घडणार नाही याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आता शिर्डी ग्रामस्थांमधून पुढे आली आहे
जाहिरात