युरोपातील जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, रशिया, डेन्मार्क आदी देशातील विदेशी साई भक्तांची भेट!
शिर्डी येथे श्री साईबाबांच्या दर्शनाला देश विदेशातून साईभक्त नेहमी येत आज रविवारीही युरोपातील जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रीया, रशिया, चेक व डेन्मार्क या देशांतील ३७ महिला व १५ पुरुष असे एकुण ५२ परदेशी साईभक्तांनी श्री साईबाबांच्या माध्यान्ह आरतीस उपस्थित राहून श्रींचे समाधीचे दर्शन घेतले. आरती नंतर साई संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी त्यांचा सत्कार करुन स्वागत केले.
यावेळी प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते. तसेच यानंतर सर्व परदेशी साईभक्तांनी श्री साई प्रसादालयात भेट देऊन प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. यावेळी श्रीसाई प्रसादालय प्रमुख विष्णू थोरात उपस्थित होते. या विदेशी साईभक्तांनी शिर्डीला भेट देऊन साई दर्शन व प्रसादालयात प्रसाद भोजन घेऊन समाधान व्यक्त केले . एवढ्या मोठ्या विदेशी साई भक्तांना पाहून इतर साई भक्तांना व ग्रामस्थांनाही त्यांचे मोठे कुतूहल वाटत होते.