कोपरगाव शहरातील येवला रोडवर अभिषेक ऍग्रोसमोर आज सकाळी ८.३३ वाजेच्या सुमारास अंगात गर्द लाल रंगाचा टी.शर्ट अंगात व गळ्यात तुळशी माळ असलेल्या एक ४० वर्षीय इसमाचा अपघात झाला असून यात तो जागीच ठार झाला आहे.मात्र त्याचा बस खाली अपघात झाला की त्याने आत्महत्या केली याचा शोध कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.तथापि सदर इसमाची अद्याप ओळख पटलेली नाही.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरातील नगर-मनमाड रोडवर आज सकाळी ८.३३ वाजेच्या सुमारास एक अंगात गर्द लाल रंगाचा टी शर्ट व गळ्यात तुळशी माळ असलेला इसम रस्त्याच्या कडेला उभा असताना दिसत असून तो एक ट्रक व राज्य परिवहन मंडळाची बस एकाच वेळी जात असताना तो बस खाली सापडला असून या अपघातात तो जागीच ठार झाला असल्याचा कयास व्यक्त होत आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस तपास करत असून सदर इसम कोण याचा शोध घेत आहेत.मात्र आज रात्री ०८ वाजे पर्यत त्याचा शोध लागला नव्हता.या प्रकरणी आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी अद्याप शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान सदर अपघाताचे चलचित्रण उपलब्ध झाले असून यातील इसम आधी रस्त्याच्या कडेला उभा असताना दिसत असून त्यावेळी एक ट्रक आणि बस एकाच वेळी पश्चिम बाजूने येवल्याकडे जात असताना तिला एक राज्य परिवहन मंडळाची बस ओलांडताना दिसत असून त्या वेळी रस्त्याच्या बाजूला उभा असलेला इसम बस खाली बसून घेताना दिसत आहे.
त्यामुळे हा अपघात नसून आत्महत्या असावी असा कयास सूत्रांनी व्यक्त केला आहे.या बाबत ओळख पटल्यावर पुढील माहिती उपलब्ध होईल असे दिसत आहे.दरम्यान या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.