पुन्हा एकदा देवेंद्रजीच्या रुपाने राज्याला तरुण-तडफदार व अभ्यासू व विकासाचे व्हिजन असणारे मुख्यमंत्री म्हणून लाभले ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी यावेळी बोलताना दिली. राहाता येथे मुख्य चौकात मा.ना.देवेंद्रजी फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले या निमित्ताने राहाता नगरपालिकेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा
मा. ममताभाभी पिपाडा तसेच डॉ. राजेंद्र पिपाडा मित्र मंडळाच्या वतीने राहाता येथे कार्यकर्त्यांसमवेत फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताषाच्या गजरात करत व एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा करुन राहात्याच्या मुख्य चौकापर्यंत मिरवणुक काढुन आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी दिलीपराव वाघमारे,पोपटराव वर्पे, मदनराव तारगे, शिवाजी आनप,श्रृती पिपाडा,नेमीचंद लोढा, गौरव जगताप, गणेश सोनिमिंडे, दत्ताभाऊ वर्पे, नरेंद्र पिपाडा, राजेंद्र शिंदे,रौनक धाडीवाल, कमलनयन टाकी, सागर गुंजाळ, अँड.अभिजित वाघमारे,अविनाश धुमसे,मदनलाल पिपाडा, महेंद्र पिपाडा, महावीर पिपाडा,संतोष गुंजाळ, योगेश मुनावत, गोरख गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. राजेंद्र पिपाडा म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्रीपदी देवेंद्रजी फडणवीस यांची निवड झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची व सर्वसामान्य जनतेच्या मनातील इच्छा होती. ती आज पूर्ण झाली याचा मनस्वी आनंद आम्हाला होत आहे. याधीही राज्याच्या जनतेने देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द पाहिलेली आहे.
त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे राज्याचा कारभार पहिला. कुठल्याही आव्हानाला सामोरे जाण्याची क्षमता असलेले अतिशय अभ्यासू व धडाडीने निर्णय घेण्याची क्षमता असलेले नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले मुख्यमंत्री या राज्याला लाभले आहेत. शिर्डी संस्थांनच्या कामगारांचा प्रश्न असो किवा फूल उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न असो, आम्ही पाठपुरावा केल्यानंतर तत्परतेने निर्णय घेऊन न्याय देणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्रजी फडणवीस हे आहेत.