शिर्डी (प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील
सावळीविहीर बुद्रुक येथील ग्रामदैवत श्री परशुराम महाराज यात्रेनिमित्त येथे दोन दिवस विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी श्री दत्त जयंतीच्या दिवशी शनिवार 14 डिसेंबर 2024 रोजी श्री
दत्त जयंती निमित्ताने येथे कोपरगावहून पायी पहाटे येथील तरुणांनी कावडीने आणलेल्या गोदाजलाची गावातून डीजेच्या निनादात व श्री परशुराम महाराज यांचा
जयजयकार करत सकाळी मिरवणूक काढण्यात आली.
त्यानंतर या पायी आणलेल्या गोदाजलाने श्रीं ना ज्यालाभिषेक घालण्यात आला.व नंतर अभिषेक, पूजा झाली .त्यानंतर भोजडे येथून भक्तांनी आणलेल्या मानाच्या काठीची गावातून डफाच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीच्या वेळी गावात महिलांनी रांगोळ्या काढून ठीक ठिकाणी या मानाच्या उंच काठीची व या भक्तांची महिलांकडून पूजा करण्यात येत होती. त्यानंतर भोजडे येथील भक्तांकडून सायंकाळी परशुराम बाबाचे दर्शन घेऊन व गावात श्री हनुमानचे दर्शन घेतल्यानंतर भक्तांकडून रूई रोडला मुलांनी खचाखच भरलेल्या बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. बैलगाड्यांच्या पुढे आकर्षक रांगोळ्या व फुलांची सजावट करण्यात आली होती. या बारा बैलगाड्या ओढल्यानंतर श्री परशुराम महाराज मंदिरा समोर भक्तांकडून जसा माझा आनंद केला तसा या गावचा, वस्तीचा आनंद होईल.असे भाकित वर्तवण्यात आले. त्यानंतर उपस्थित भाविक, भक्तांना महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. या महाप्रसादाचा लाभही मोठ्या संख्येने भाविकांनी घेतला.
त्यानंतर रात्री बाजारतळावर भव्य अशी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तसेच भोजडे येथून आलेल्या भक्तांचा श्री परशुराम मंदिरासमोर रात्री डफाच्या तालावर
व्हईक गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. सर्व धार्मिक कार्यक्रमांना भोजडे येथील भक्त रंगनाथ कारभारी मंचरे ,रामेश्वर रंगनाथ मंचरे ,नामदेव श्रावण मंचरे,
रखमाजी कारभारी मंचरे, बाबासाहेब रखमाजी मंचरे, संतोष रखमाजी मंचरे, रामदास आसाराम मंचरे ,दीपक रामदास मंचरे ,कैलास उमाजी मंचरे, बाबुराव भागुजी सिनगर, भाऊराव जगन्नाथ धट ,काटकर आदी श्री वीरभद्र परशुराम भक्त मंडळ भोजडे येथील भक्तगण उपस्थित होते.
यात्रेनिमित्ताने मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोशनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे हार, प्रसाद, नारळ खेळणीची मिठाई ,आदीची विविध दुकाने थाट
ली होती. यात्रेनिमित्ताने सासरी गेलेल्या मुली व नोकरीसाठी गेलेले मुले गावी आले होते. अनेकांनी नवस फेडण्यासाठी गुळाची शेरणी तसेच पेढे वाटून , श्री ना पाच किंवा अकरा नारळाचे तोरण अर्पण करून आपले नवस फेडले. इथे दर्शनासाठी भाविकांची दिवसभर मोठी गर्दी दिसून येत होती.
रविवार दिनांक १५ डिसेंबर 24 रोजी लावण्यचंद्रा राधिका पाटील, मुंबईकर यांचा आर्केस्ट्रा रात्री बाजारतळ मैदानावर होणार आहे. विविध कार्यक्रम व यात्रा यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी श्री परशुराम महाराज यात्रा उत्सव कमिटी व ग्रामस्थ सावळीविहीर बुद्रुक हे परिश्रम घेत आहेत.