शिर्डी प्रतिनिधी/
दि. ३ जुलै रोजी सिल्व्हर ओक लॉन्स येथील रिसेप्शना वेळी पुतणी या हातातील पर्स बाजूला ठेवून फोटो काढण्यासाठी स्टेजवर गेल्या. त्यावेळी एक अनोळखी मुलाने पुतणीची ८ लाख ५० हजार रोख रक्कम असलेली बॅग चोरुन नेली, या किसनलाल बाबुलाल कोठारी (रा. बोलठाण, ता. नांदगांव, जिल्हा नाशिक) यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिस ठाण्यात गु.र.नं. ३९२/२४ भारतीय न्याय संहिता क. ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. या दाखल गुन्ह्या होताच जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी एलसीबी पोनि दिनेश आहेर यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे बाबत आवश्यक सूचना देऊन पथक रवाना केले. एलसीबी टिम’ने सिल्व्हर ओक लॉन्स शिर्डी येथील आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. तसेच रिसेप्शन वेळी कार्यक्रमाचे व्हिडीओ शुटींग व फोटो ग्राफर यांच्याकडील व्हिडीओ शुटींग व फोटो तपासले असता एक गो-या रंगाचा मुलगा बॅग उचलून घेऊन जातांना दिसून आला. एलसीबी पथकाने फुटेज सोशलमिडीयाव्दारे तसेच गुप्तबातमीदारांना पाठविले होते. या पथकाने दि.१३ जुलै रोजी संशयीत मुलाचा शोध घेत असतांना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत शिर्डी येथील लग्न समारंभामध्ये चोरी करणारा गो-या रंगाचा व अंगामध्ये राखाडी रंगाचा नक्षीकाम असलेला शर्ट घातलेला मुलगा पाठीवर बॅग घेऊन पत्रकार चौकाकडून तारकपुर बसस्थानकाकाडे पायी जात आहे, आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ तारकपूर रस्त्याने जाऊन पहाणी करता एक १४ ते १५ वर्षे वयाचा गो-या रंगाचा पाठीवर बॅग घेतलेला व रस्त्याने पायी चाललेला मुलगा दिसला. त्यास थांबवून त्याचेकडे चौकशी करता तो अल्पवयीन (विधीसंघर्षीत) असल्याचे निष्पन्न झाले. अल्पवयीन मुलाची पंचा समक्ष झडती घेता त्याचे झडतीमध्ये रोख रक्कम मिळून आली. रोख रकमेबाबत त्याच्याकडे विचारपुस करता त्याने मागील १० ते १२ दिवसांपूर्वी शिर्डी येथील लग्नातून चोरी केलेल्या बॅगेतील रोख रक्कम असल्याचे सांगितल्याने विधीसंघर्षीत बालकास ४५ हजार रुपये रोख रकमेसह ताब्यात घेऊन शिर्डी पोलीस ठाणे येथे हजर केले आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे करीत आहे
जाहिरात