तरुणीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार,सात आरोपींवर गुन्हा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
तरुणीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार,सात आरोपींवर गुन्हा
कोपरगाव तालुक्याच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन तरुणीचे चार तरुणांनी फूस लावून पळवून नेले व त्यानंतर नंतर शिर्डी,नगर आदी ठिकाणी हॉटेल मध्ये लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली असून यातील एकूण ०७ आरोपींवर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती हाती आली असून त्याबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
कोपरगाव शहरातील अंबिकानगर येथील रहिवासी असलेला आरोपी अभिषेक वसंत कनगरे याने येवला शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या युवतीवर एक वर्ष शारीरिक अत्याचार केल्याची घटना ताजी असताना आणखी एक लैंगिक अत्याचाराची घटना कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच उघड झाली असून यातील आरोपी तालुक्याच्या पूर्व भागातील भोजडे ग्रामपंचायत हद्दीतील असल्याची खात्री लायक माहिती हाती आली आहे.
दरम्यान उशिराने मिळालेल्या माहितीनुसार यातील पहिला आरोपी हा रामवाडी संवत्सर येथील असून त्याचे नाव तेजस सतीश शेटे (वय-२० वर्षे) असून दुसरा आरोपी हा भोजडे गावातील असून त्याचे नाव स्वप्नील भारूड असे आहे. तर तिसरा आरोपी हा भोजडे चौकी येथील असून त्याचे नाव प्रतीक शरद शिनगर (वय-१७) आहे तर अन्य अज्ञात ०४ आरोपी अज्ञात असल्याची माहिती आहे.त्यांचा पोलीस शोध घेत आहे.
दरम्यान सदर गुन्हा हा आधी सदर मुलीचे अज्ञात कारणासाठी अपहरण केले असल्याचा गुन्हा तिच्या नातेवाईकांनी दाखल केला होता.मात्र तिचा शोध घेताना पोलिसांनी एक पथक नेमले होते.त्यात सदर मुलीचा शोध घेतला असता तिचा जबाब पोलिसांनी। नोंदवला असता वरील घटना उघडकीस आली आहे.
दरम्यान यातील आरोपींनीं यात पीडित अल्पवयीन मुलीस लौकी शिवारात दि.२० एप्रिल रोजी रात्री ०९ वाजेच्या नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याचे उघडकीस आले आहे.त्यानंतर दि.२१ एप्रिल रोजी शिर्डी येथील एका हॉटेल पुन्हा हा प्रकार घडला आहे.तर दि.०१ मे रोजी रात्री १० वाजता व दि.०४ मे रोजी पून्हा एकदा अ.नगर येथील ‘हॉटेल राजश्री’वर त्याची पुनरावृत्ती घडली असल्याची माहिती माहितगार सूत्रांकडून हाती आली आहे.यात एक अनोळखी मोटार सायकलचा वापर करण्यात आला असल्याची माहिती आहे.त्याचा पोलीस अधिकारी शोध घेत आहे.
दरम्यान यातील अल्पवयीन पीडित मुलीच्या जबाबावरून कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी कलम वाढवले असून भा.द.वि.कलम ३७६,३७६(२),(एन),३७६(३),३६६(अ),सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम-२०१२ चे कलम ४,६,८,प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आल्याची माहिती हाती आली आहे.
दरम्यान याबाबत आधी पंधरा दिवस आधी सदर तरुणीची अपहरण केल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात तिच्या नातेवाईकांनी दाखल केला होता.त्यांनतर त्या घटनेचा तपास करताना हि खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे.
दरम्यान यातील प्रतीक सिनगर यास पोलिसांनी अटक केली असून तो अल्पवयीन असल्याने त्यास नगर येथील बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे.तर अन्य दोन आरोपी सतीश शेटे आणि स्वप्नील भारूड यांना अटक आरोपीस न्यायालयास हजर केले असता त्यास आगामी १५ मे पर्यंत पोलीस कोठडी सूनावली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.तर अन्य चार आरोपींचा पोलीस अधिकारी शोध घेत आहे.