शिर्डी( प्रतिनिधी)
आशिया व ऑस्ट्रेलिया या दोन्ही खंडांमध्ये असलेल्या सर्व देशांमधील विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची इंटरनॅशनल ट्रेडमार्क असोसिएशन तर्फे घेण्यात येणाऱ्या मूट कोर्ट कोंपीडिशन स्पर्धेमध्ये मुंबई चर्चगेट येथील गव्हर्नमेंट लॉ कॉलेज (शासकीय विधी महाविद्यालयातील) विशेष गुणवत्ता प्राप्त असे गौरव जितेश लोकचंदानी ,अवंती भंडारवार, मृदुल झंवर,व ऋतुजा तीकोटे यांच्या टीमने या ट्रेडमार्क कायदेविषयक स्पर्धेत मोठा विक्रम करत या स्पर्धेत टॉपच्या वीस संघामध्ये येण्याचा किताब मिळवला आहे .
त्यामुळे या मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयाच्या गौरव लोकचंदानी , अवंती भंडारवार, मृदुल झंवर व ऋतुजा तीकोटे या विधी विद्यार्थ्यांचे मुंबई चर्चगेट येथील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे प्राचार्य सौ.अस्मिता वैद्य सो तसेच सर्व प्राध्यापक सो, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे .कौतुक होत आहे
.
शासकीय विधी महाविद्यालयातील हे भारतामधील एक प्रसिद्ध व अतिशय जुने असे जगप्रसिद्ध विधी महाविद्यालय आहे. अशा या विद्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जेष्ठ न्यायविधीतज्ञ् तथा सरकारी वकील उज्ज्वल निकम,राम जेठमालांनी, आदींनी विधी शिक्षण घेतल्याचे बोलले जाते.
अशा या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणे मोठे कठीण असते. कारण या विधी महाविद्यालयात प्रवेश हा मोजक्या व भारतातील अतिशय हुशार विद्यार्थ्यांनाच त्यांची परीक्षा घेऊन प्रवेश दिला जातो. असे टॅलेंट विद्यार्थी या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये शिकत असून विविध स्पर्धेतही ते नेहमी सहभाग घेत असतात. त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयातही महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच प्रॅक्टिस करत असतात.
नुकतीच इंटरनॅशनल ट्रेडमार्क असोसिएशन यांनी आंतरराष्ट्रीय लेव्हलची स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये आशिया व ऑस्ट्रेलिया खंडातील सर्व देशातील विधी महाविद्यालयातील हुशार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विशिष्ट एखाद्या प्रकरणाची कायदेशीर व मुद्देसूद फाईल माननीय न्यायाधीश महोदयांकडे सुटसुटीतपणे व कायद्याचा अभ्यास करून सादर करण्यासंदर्भात ही एक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चुणूक दाखवणारी स्पर्धा होती.
फाईल सादर करण्यासाठी 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत होती व त्यानंतर दहा डिसेंबर 2024 रोजी या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत अशा सहभागी झालेल्या टॅलेंट विद्यार्थ्यांच्या शेकडो टीम मधून या स्पर्धेत टॉप 20 च विद्यार्थ्यांच्या टीम काढल्या गेल्या. या वीस मध्ये गव्हर्नमेंट लॉ कॉलेज चर्चगेट मुंबई येथील गौरव जितेश लोकचंदानी, अवंती भंडारवार, मृदुल झंवर, ऋतुजा तीकोटे यांचीही टीम उत्कृष्ट काम केल्याबद्दल या स्पर्धेत टॉप ट्वेंटी मध्ये आली आहे .
यानंतर दिल्ली येथे आठ व नऊ फेब्रुवारी 2025 रोजी या टॉप ट्वेंटी मधून परत स्पर्धा घेतली जाणार असून अंतिम विजेती टीम येथे घोषित होणार आहे . मात्र आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टॉप ट्वेंटी मध्ये येण्याचा मन मुंबई चर्चगेट येथील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजच्या या विद्यार्थ्यांना मिळाला आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांचे व या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.