न्यायविधी तज्ञ ऍडव्होकेट वैभव मोहनराव पवार पाटील यांची नोटरी पदी नियुक्ती
न्यायविधी तज्ञ ऍडव्होकेट वैभव मोहनराव पवार पाटील यांची नोटरी पदी नियुक्ती
राहूरी तालुक्यातील देसवंडी गावाचे सुपुत्र वैभव पवार त्यांचि आज भारत सरकारने त्यांच्या कामाची दखल घेत भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती केली आहे.
यांचे वडील ज्येष्ठ न्यायाविधी तज्ञ मोहनराव धोंडीराम पवार पाटील हे गेल्या 45 वर्षापासून राहुरी न्यायालयात वकिली करत आहे त्यांच्या शेतकरी कुटुंबात जन्म झाला असून समाजातील अन्याय झालेल्या तसेच न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या वकिली व्यवसायातून ॲडव्होकेट वैभव पवार पाटील यांनी प्रामाणिक प्रयत्न करत न्याय मिळवून देण्याचे काम केले माणुसकीच्या भावनेतून गोरगरीब लोकांना न्यायालयात न्याय मिळवून देणारे वैभव पवार पाटील हे परिचित आहेत त्यांचे आजोबा गुरूजी होते तंटा निवारणचे काम त्यांनीं केलेले आहेत वैभव पवार हे गेल्या 17 वर्षापासून अहमदनगर जिल्हा न्यायालयात वकिली करतात सुरुवातीला ऍडव्होकेट नामदेव दरंदले प्रॅक्टिस केलेली आहे त्यांच्या पत्नी सौ. रेणुका वैभव पवार ऍडव्होकेट आहेत यांच्याकडे आज भारत सरकारने त्यांच्या कामाची दखल घेत भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती केली त्यांचि नियुक्ती झाल्याचे कळताच राज्यभरातून वकील सहकारी,राजकीय पदाधिकारी, वकील संघ,नातेवाईक,मित्रपरिवार असे अनेक लोकांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत